AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वैवाहिक वादाला कंटाळून पत्नी माहेरी राहत होती, पती घरी न्यायला आला असता महिलेने नकार दिला; मग…

मयत वंशिका आणि आरोपी नरेशचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरुन सतत भांडण होत होते. याच भांडणाला कंटाळून पत्नी गेल्या सहा महिन्यांपासून माहेरी राहत होती.

वैवाहिक वादाला कंटाळून पत्नी माहेरी राहत होती, पती घरी न्यायला आला असता महिलेने नकार दिला; मग...
काळा रंग पसंत नव्हता म्हणून पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: Google
| Updated on: Feb 18, 2023 | 9:42 AM
Share

गाझियाबाद : रागाने माहेरी आलेली पत्नी सासरी यायला तयार नसल्याने संतापलेल्या पतीने चाकून वार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये घडली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती फरार झाला. गाझियाबादमधील आर्यनगरमध्ये ही घटना घडली आहे. काही वेळाने महिलेच्या घरचे रुममध्ये गेले असता हत्येची घटना उघड झाली. याप्रकरणी महिलेच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरुन कोतवाली पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वंशिका असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे, तर नरेश असे हत्या करणाऱ्या आरोपी पतीचे नाव आहे. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

सततच्या भांडणाला कंटाळून महिला माहेरी राहत होती

मयत वंशिका आणि आरोपी नरेशचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरुन सतत भांडण होत होते. याच भांडणाला कंटाळून पत्नी गेल्या सहा महिन्यांपासून माहेरी राहत होती. शुक्रवारी रात्री नरेश सासरवाडीला आला आणि पत्नीला घरी परत येण्यासाठी सांगत होता.

पत्नी घरी यायला तयार नसल्याने पतीने चाकूने भोसकले

वंशिकाने पतीसोबत सासरी परत जाण्यास नकार दिला. यावरुन बराच वेळ दोघांमध्ये बोलणे सुरु होते. पती पत्नीची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होता. यादरम्यान, पतीने पत्नीने रुममध्ये जाऊन बोलूया सांगत छतावरील खोलीत नेले. खोलीत जाताच पतीने चाकू काढला आणि पत्नीच्या पोटावर, गळ्यावर, चेहऱ्यावर वार केले. यानंतर पती फरार झाला.

पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल

बराच वेळ झाला तरी वंशिका खाली आली नाही म्हणून घरचे लोक रुममध्ये पहायला गेले असता महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. नातेवाईकांनी तात्काळ तिला रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यानंतर वंशिका घरच्यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.