आधी झोपेच्या गोळ्या देऊन बेशुद्ध केले, मग अत्यंत क्रूर पद्धतीने संपवले; पत्नीने पतीसोबत असे का केले?

पत्नीचा परपुरुषावर जीव जडला. तिच्या या अनैतिक संबंधात पती अडथळा ठरत होता. यामुळे पतीचा अडसर दूर करण्यासाठी पत्नीने एक कट रचला. पत्नीने जे केले पाहून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली.

आधी झोपेच्या गोळ्या देऊन बेशुद्ध केले, मग अत्यंत क्रूर पद्धतीने संपवले; पत्नीने पतीसोबत असे का केले?
अनैतिक संबंधातून पत्नीने पतीला संपवले
Image Credit source: Social Media
| Updated on: Apr 07, 2023 | 3:22 PM

पुरुलिया : पश्चिम बंगालमधील पुरुलिया जिल्ह्यात अनैतिक संबंधातून एक धक्कादायक घटना उजेडात आली आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीला आपल्या मार्गातून दूर करण्यासाठी पत्नीने भयानक कट रचला. या कटात महिलेच्या प्रियकराने तिला मदत केली. आधी तिने पतीला झोपेच्या गोळ्या देऊन बेशुद्ध केले. नंतर त्याची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी तिने पतीचा मृतदेह जमिनीमध्ये पुरला आणि त्या मृतदेहावर मीठ टाकले. जेणेकरून मृतदेह लवकर सडून पुरावा नष्ट होईल. महिलेचे हे कृत्य उघड होताच परिसरात प्रचंड खळबळ उडाली.

पतीची हत्या केल्याचे उघड होऊ नये म्हणून तिने केलेला खटाटोप तीन दिवसांतच उघडकीस आला आणि तिच्या अनैतिक संबंधाचेही बिंग फुटले. याप्रकरणी पोलिसांनी हत्या करणाऱ्या महिलेसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

हत्या करुन मृतदेह जमिनीत पुरला

गेल्या महिन्याच्या अखेरीस जयपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे हत्याकांड घडले. जुरान महतो असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी जुरान याची पत्नी उत्तरा आणि तिचा प्रियकर क्षेत्रपाल महतो या दोघांना अटक केली आहे. उत्तराने प्रियकराच्या सोबतीने पतीची हत्या केल्यानंतर घराशेजारील परिसरात मृतदेह दफन केला होता.

तिच्या या कृत्याची सुरुवातीला कुणालाच कुणकुण लागली नव्हती. जुरान हा 20 मार्चपासून बेपत्ता होता. याबाबत तीन दिवसांनंतर जुरान याचा मुलगा अपूर्बा याने पोलिसांत तक्रार नोंदवली होती. त्यानंतर सगळीकडे शोधाशोध सुरु होती. याचदरम्यान घराच्या परिसरात दुर्गंधी येऊ लागल्याने तेथे खोदकाम केले असता मृतदेह आढळून आला.