VIDEO | गजबजलेल्या चौकात मॉडेलचा डान्स, नेटिझन्सनी फटकारलं, गुन्हा दाखल

| Updated on: Sep 17, 2021 | 10:34 AM

मॉडेल श्रेया कालरा इंदौरच्या रासोमा स्क्वेअर येथील झेब्रा क्रॉसिंगवर डोजा कॅटच्या 'वुमन' या व्हायरल गाण्यावर नाचताना दिसली होती. इन्स्टाग्राम रीलमध्ये शेअर केलेल्या या व्हिडीओत ट्रॅफिक सिग्नल लाल झाल्यावर गाड्या थांबल्यानंतर श्रेया कालरा रस्त्यावर थिरकताना दिसते.

VIDEO | गजबजलेल्या चौकात मॉडेलचा डान्स, नेटिझन्सनी फटकारलं, गुन्हा दाखल
Model Shreya Kumar Flash Mob Dance
Follow us on

भोपाळ : इंदूरमधील एका गजबजलेल्या चौकामध्ये डान्स करणाऱ्या मध्य प्रदेशातील इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. श्रेया कालरा (Shreya Kalra) असे या मॉडेलचे नाव आहे. ही क्लिप व्हायरल होताच वाहतूक थांबवून रस्त्यावर नाचल्याबद्दल श्रेयाला नेटिझन्सनी फटकारले होते.

काय आहे प्रकरण?

लोकप्रिय मॉडेल श्रेया कालरा इंदौरच्या रासोमा स्क्वेअर येथील झेब्रा क्रॉसिंगवर डोजा कॅटच्या ‘वुमन’ या व्हायरल गाण्यावर नाचताना दिसली होती. इन्स्टाग्राम रीलमध्ये शेअर केलेल्या या व्हिडीओत ट्रॅफिक सिग्नल लाल झाल्यावर गाड्या थांबल्यानंतर श्रेया कालरा रस्त्यावर थिरकताना दिसते. तिला पाहून पादचारी आणि वाहनचालकही गोंधळलेल्या अवस्थेत होते. पब्लिक ट्रेण्डसाठी दिलेल्या डेअरचा हा भाग असल्याचं त्या व्हिडीओमध्ये लिहिलं आहे.

पाहा व्हिडीओ :

मॉडेल श्रेया कालराचे स्पष्टीकरण

दरम्यान, हा 30 सेकंदांचा व्हिडिओ लाल सिग्नल असताना चित्रित करण्यात आला होता आणि रहदारीचे नियम मोडण्याचा आपला हेतू नव्हता, असे तिने स्पष्ट केले आहे. “कृपया वाहतुकीचे नियम मोडू नका – लाल चिन्हाचा अर्थ असा आहे की तुम्हाला सिग्नलवर थांबावे लागेल, मी नाचत आहे म्हणून थांबू नका आणि तुमचे मास्क घाला.” असे व्हिडीओ कॅप्शन अपडेट करत तिने लिहिले होते.

गृहमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश

श्रेयाच्या स्पष्टीकरणानंतरही मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा, जे इंदूरचे पालकमंत्री देखील आहेत, त्यांनी अधिकाऱ्यांना तिच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. “मी ट्रॅफिक सिग्नलवर फ्लॅश मॉब करणाऱ्या मॉडेलवर नियमांनुसार कारवाई करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. फ्लॅश मॉब्समागील भावना काहीही असली तरी ही पद्धत चुकीची आहे. ” असं मिश्रा म्हणाले होते. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी मोटार वाहन कायद्यांतर्गत तिच्यावर कारवाई करण्याचे आदेश देणार असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, इंदूरचे ट्रॅफिक डीएसपी उमाकांत चौधरी म्हणाले की, पोलिसांनी व्हिडीओची दखल घेतली आहे. त्यांनी जनतेला नियमांचे पालन करण्याचे आणि त्यांच्या अशा उपक्रमांमध्ये सहभागी होण्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले. श्रेयाला नोटिस पाठवण्यात आली असून तिला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

ढिंचॅक पूजाच्या नव्या गाण्याची चर्चा, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस, नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

मोबाईल हवा म्हणून माकडाने दाखवला समजूतदारपणा! व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल अवाक्!

मांजरीची कमाल, महिलेची केली हुबेहूब नक्कल, मजेदार व्हिडीओ पाहाच