बायको माहेरी गेल्यावर नौसैनिकाने मोनिकाला घरी बोलावल व तिच्यासोबत..धड फ्रिजमध्ये तर डोकं..डेंजर Love Story
प्रेमात आदर, आपुलकी, काळजी या भावना असतात. प्रेम माणसाला हिंसक बनवत नाही. पण एका नौदल कर्मचाऱ्याचं प्रेम मात्र अपवाद ठरलय. हादरवून सोडणारं प्रकरण समोर आलय. प्रेमाचा इतका भयानक शेवट. खरच वाचून काळजाचा थरकाप उडेल.

अनैतिक संबंधातून हत्येचं एक भयानक प्रकरण समोर आलं आहे. महत्वाचं म्हणजे यात आरोपी भारतीय नौदलात काम करतो. रविंद्र (30) असं आरोपीचं नाव असून तो INS डेगावर तैनात होता. या प्रकरणात एक तरुणीची हत्या झाली असून तिचं नाव मोनिका (31) आहे. पत्नी माहेरी गेल्यानंतर आरोपी रविंद्रने मोनिकाला फोन करुन घरी बोलवून घेतलं. पण त्यांची ही भेट मोनिकासाठी मृत्यूच निमंत्रण ठरलं. दोघांमध्ये कुठल्यातरी कारणावरुन वाद झाला. रागाच्या भरात रविंद्रने मोनिकाची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. मिंगल या डेटिंग App वरुन 2021 मध्ये दोघांची ओळख झाली होती. दोघे विशाखापट्टणम येथे वेगवेगळ्या ठिकाणी भेटायचे असं पोलिसांनी सांगितलं. त्यांच्यामध्ये प्रेम, अनैतिक संबंध निर्माण झाले होते. विशाखापट्टणम मधील हे प्रकरण आहे.
काही आठवड्यापूर्वी रविंद्रची पत्नी तिच्या आई-वडिलांच्या घरी गेली. त्याला वाटलं की, गर्लफ्रेंड सोबत वेळ घालवण्यासाठी हा चांगला वेळ आहे. रविंद्रने रविवारी दुपारी मोनिकाला फोन केला आणि बोलवून घेतलं. संध्याकाळी त्या दोघांमध्ये कशावरुन तरी भांडण झालं. रविंद्रने गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर त्याने ऑनलाइन डिलिवरी प्लॅटफॉर्मवरुव चाकू विकत घेतला आणि मृतदेहाचे तुकडे केले. प्राथमिक तपासातून रविंद्राने मोनिकाचं डोकं, पाय आणि हात कापून वेगळे केले.
हत्येचं कारण काय?
त्याने पाय एका ट्रॉली बॅगेत भरले. धड फ्रिजमध्ये ठेवलं. डोकं आणि हात एका वेगळ्या ठिकाणी नेऊन जाळले. त्यानंतर रविंद्र स्वत: पोलीस स्टेशनमध्ये गेला व गुन्ह्याची कबुली दिली. रिलेशनशिपमध्ये असताना मोनिकाने माझ्याकडे साडेतीन लाख रुपये घेतले होते. पत्नीकडे संबंध उघड करण्याची ती सतत धमकी द्यायची. हेच त्या दोघांमधील भांडणाचं कारण होतं.
मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये सापडले
त्यातूनच त्याने मोनिकाची हत्या केली. मोनिकाने जो छळ चालवलेला, सतत धमक्या द्यायची त्याला रविंद्र कंटाळलेला. म्हणून त्याने हत्येचा कट रचला असा दावा पोलिसांनी केला. 2024 साली रविंद्रचं लग्न झालं होतं. पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यावेळी त्यांना कापलेले मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये मिळाले.