Parth Pawar | निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात; वरिष्ठ नेत्यांच्या समर्थनार्थ भूमिका
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विविध घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विविध घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या पत्रामध्ये राष्ट्रीय अध्यक्षांप्रमाणेच कार्याध्यक्षांनाही अधिकार देण्याची मागणी करण्यात आली होती. दरम्यान, शरद पवार गटाकडून राष्ट्रवादी पक्ष ‘हायजॅक’ केला जात असल्याचा आरोप यापूर्वीच करण्यात आला होता. त्यानंतर हे पत्र समोर आल्यानंतर विविध दावे आणि अटकळींना सुरुवात झाली आहे. या सर्व घडामोडींवर अजित पवार गटाचे नेते आणि खासदार पार्थ पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सोशल मीडियावरील ट्विटद्वारे प्रतिक्रिया देताना म्हटले की, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना विनाकारण लक्ष्य केले जात आहे. तसेच, निराधार बातम्या आणि तर्क-वितर्कांवर आधारित चर्चांमुळे या वरिष्ठ नेत्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक दशकांपासून त्यांनी दिलेले योगदान महत्त्वाचे असून, अशा नेत्यांना बनावट वादांमध्ये ओढणे दुर्दैवी असल्याचेही पार्थ पवार यांनी स्पष्ट केले.
Published on: Apr 02, 2026 05:01 PM
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात; पहा व्हिडीओ
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल
धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेता

