Parabhani Godavari | परभणीजवळच्या गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यातच धार्मिक विधी
सध्या राज्यभरात वायू प्रदुषणाप्रमाणे जल प्रदुषणाचेही प्रमाण खूप वाढत असून ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. शहरातून येणाऱ्या सांडपाण्यामुळे नदीपात्रात घाणीचं साम्राज्या पहायला मिळत आहे.
सध्या राज्यभरात वायू प्रदुषणाप्रमाणे जल प्रदुषणाचेही प्रमाण खूप वाढत आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून नदीपात्रातील प्रदुषण एका प्रकारे नागरिकांच्या जीवाशी चाललेला खेळच आहे. अलीकडे गंगाखेड येथील गोदावरी पात्रचे काही फुटेज समोर आले आहेत. गोदावरी प्रदूषणाच्या विळख्यात कशी अडकलीय, हे या दृश्यांवरून स्पष्ट दिसून येतंय.
गोदावरी नदीला धार्मिक दृष्या खूप महत्त्वाचं मानलं जात तसेच या गोदावरी पात्राला नदीची नाभी असं देखील संबोधलं जातं. परभणीतील गंगाखेड शहरापासून काही अंतरावर खेड परिसरात गोदावरीचं हे बिकट रूप बघायला मिळतंय. शहरातुन येणाऱ्या सांडपाण्यामुळे या नदीपात्राला नाल्याचं रुप आलं आहे. सणासुदीला नागरिकांना याच दुषित पाण्यात पुजाविधी कराव्या लागतात.
Published on: Apr 02, 2026 05:45 PM
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे

