नंदुरबार पोलिसांनी सुतावरुन स्वर्ग गाठला, गुगल मॅपच्या मदतीने सराईत आंतरराज्य गुन्हेगारांची टोळी जेरबंद

| Updated on: Nov 26, 2021 | 1:11 PM

दिवाळीच्या काळात नंदुरबार शहर (Nandurbar City) आणि जिल्ह्यात दिवसा घरफोडीच्या (Burglary Case) घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. वाढत्या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, आता नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने गुगल मॅपच्या सहाय्याने वेगवेगळ्या शहरात जाऊन रेकी करुन घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य गुन्हेगारांची टोळी अखेर जेरबंद केलीये.

नंदुरबार पोलिसांनी सुतावरुन स्वर्ग गाठला, गुगल मॅपच्या मदतीने सराईत आंतरराज्य गुन्हेगारांची टोळी जेरबंद
Nandurbar Police
Follow us on

नंदुरबार : दिवाळीच्या काळात नंदुरबार शहर (Nandurbar City) आणि जिल्ह्यात दिवसा घरफोडीच्या (Burglary Case) घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. वाढत्या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, आता नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने गुगल मॅपच्या सहाय्याने वेगवेगळ्या शहरात जाऊन रेकी करुन घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य गुन्हेगारांची टोळी अखेर जेरबंद केलीये.

नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने सुतावरुन स्वर्ग गाठला

नंदुरबार शहरात घरफोडी करुन पसार होण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांवर संशय आल्यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरु केला होता. मात्र, चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले होते. त्यानंतर पोलिसांना त्यांच्या जप्त केलेल्या गाडीतून मिळालेल्या कागदांवरुन सुतावरुन स्वर्ग गाठला आहे.

पोलिसांनी फक्त गुगल मॅपच्या सहाय्याने वेगवेगळ्या शहरात जाऊन रेकी केली. त्यानंतर त्यांनी घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य गुन्हेगारांची टोळी अखेर जेरबंद केलीये. या टोळीकडून पोलिसांनी 13 लाख 14 हजार 582 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यातील दोघे आरोपी मध्यप्रदेशमधील असून ते पुण्यात वास्तव्याला होते.

शैलेंद्र विश्वकर्मा आणि संतोष सिंग असे घरफोडी करणाऱ्या आरोपींची नाव आहेत. यातील शैलेद्र विश्वकर्मावर मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि तेलांगणा राज्यात घरफोडीचे 63 गुन्हे दाखल आहेत. तर संतोष सिंग हा खुणाच्या गुन्हात 14 वर्षांची शिक्षा भोगून आलेला आहे. या आरोपींकडून चार घरफोडीतील 13 लाख 77 हजार 335 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

डॉक्टरची एक लाखाची ऑफर, डोंबिवलीत गणपती मंदिराजवळ आईने पोटचं बाळ सोपवलं, पण…

Pune crime| पोलिसांची कामगिरी ; तब्बल दीडशे सीसीटीव्ही फूटेज तपासत आवळल्या सोनसाखळी चोरांच्या मुसक्या