Pune crime| पोलिसांची कामगिरी ; तब्बल दीडशे सीसीटीव्ही फूटेज तपासत आवळल्या सोनसाखळी चोरांच्या मुसक्या

घराच्या बाहेर बाकावर बसलेल्या हबिबा शेख यांच्या गळयातील तीन तोळ्याचे दागिने हिसकावून नेले. ते चोरटे कळस गावठाणच्या दिशेने पळून गेल्याची माहिती पीडित शेख यांनी पोलिसात तक्रार करताना दिली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींबद्दल गुन्हा दाखल करून घेतला.

Pune crime| पोलिसांची कामगिरी ; तब्बल दीडशे सीसीटीव्ही फूटेज तपासत आवळल्या सोनसाखळी चोरांच्या मुसक्या
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Nov 26, 2021 | 11:33 AM

पुणे – शहरातील महिलांना लुटण्याच्या तसेच सोनसाखळी हिसकावण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. तर दुसरीकडे या वाढत्या गुन्ह्यांचीसंख्या कमी करण्यासाठी पोलिसांनीही कंबर कसल्याचं समोर आलं आहे. शहरातील विश्रांतवाडी पोलिसांनी तब्बल दीडशे सीसीटीव्ही फुटेज चेक करत दोन सराईत सोनसाखळी चोरांना अटक केली आहे. अशोक नामदेव गंगावणे (वय 31) व अनिल रघुनाथ बिरदवडे (वय 32 दोघेही रा. बांदलवाडी, बारामती ) अशी अटक करण्यात आलेल्याचोरांची नावे आहेत. त्याबरोबरच पोलिसांनी चोरीचे सोने विकत घेणाऱ्या सोनारालाही अटक केली आहे. अशोक नामदेव गंगावणे (वय 31) व अनिल रघुनाथ बिरदवडे (वय 32 दोघेही रा. बांदलवाडी, बारामती ) असे सोने खरेदी करणाऱ्या सोनाराचे नाव आहे.

असा झाला उलघडा 2 नोव्हेंबरला विश्रांतवाडी कळसमधील विशाल परिसरात घराच्या बाहेर बाकावर बसलेल्या हबिबा शेख यांच्या गळयातील तीन तोळ्याचे दागिने हिसकावून नेले. ते चोरटे कळस गावठाणच्या दिशेने पळून गेल्याची माहिती पीडित शेख यांनी पोलिसात तक्रार करताना दिली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींबद्दल गुन्हा दाखल करून घेतला. पुढे तपास करताना परिसरातील सीसी टीव्हीही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. त्यात त्यांनी साधारण कळसपासून ते बारामती पर्यंत अंदाजे दीडशे ते दोनशे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले त्यानंतर या गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा शोध लागला.

सापळा रचून केली अटक आरोपींचा शोध लागल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवली. घटनेतील आरोपी बारामतीतील 29 फाटा येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या गोपनीय माहितीच्या आधारे विश्रांतवाडी पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. कारवाई दरम्यान पोलिसांनी तीन तोळ्याचे दागिनेही हस्तगत केले. चौकशी दरम्यान चोरीच्या गुन्ह्यांची कबूलही आरोपींनी दिली आहे. ही कारवाई विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी प्रफुल मोरे, शेखर खराडे , पोलीस हवालदार दिपक चव्हाण व शिपाई संदिप देवकाते यांनी ही कारवाई केली आहे.

‘त्यांनी मालिका सोडली वाईट आम्हाला वाटलं, पण असं…’, अन्नपूर्णा विठ्ठल यांच्या आरोपांवर सुनिल बर्वेंची प्रतिक्रिया

तुरीचा काढणीपूर्वीच झाला खराटा, काय आहे उपापयोजना ? शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

Pm modi : संविधान दिवसाच्या पंतप्रधानांकडून देशवासियांना शुभेच्छा, पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री म्हणाले…

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.