‘त्यांनी मालिका सोडली वाईट आम्हाला वाटलं, पण असं…’, अन्नपूर्णा विठ्ठल यांच्या आरोपांवर सुनिल बर्वेंची प्रतिक्रिया

स्टार प्रवाहवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मलिकेत ‘आई’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल (Annapurna Vitthal) यांनी मालिकेचे दिग्दर्शक आणि मालिकेतील सहकलाकारांवर अनेक आरोप करत, त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या या आरोपांनंतर आता अभिनेता सुनील बर्वे (Sunil Barve) यांनी आता आपली प्रतिक्रिया दिली आहे.

‘त्यांनी मालिका सोडली वाईट आम्हाला वाटलं, पण असं...’, अन्नपूर्णा विठ्ठल यांच्या आरोपांवर सुनिल बर्वेंची प्रतिक्रिया
Annpurna-Sunil Barve


मुंबई : स्टार प्रवाहवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मलिकेत ‘आई’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल (Annapurna Vitthal) यांनी मालिकेचे दिग्दर्शक आणि मालिकेतील सहकलाकारांवर अनेक आरोप करत, त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या या आरोपांनंतर आता अभिनेता सुनील बर्वे (Sunil Barve) यांनी आता आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘अन्नपूर्णा यांनी मालिका सोडली ही त्यांची इच्छा होती. त्यांनी मालिकेतून काढता पाय घेतल्याने आम्हाला वाईट वाटले होते. पण आता त्या जे काही बोलतायत ते चुकीचं आहे’, असं सुनील बर्वे म्हणाले.

अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल यांनी मालिकेत ‘आई’ची भूमिका साकारली होती. अभिनेत्रीने या मालिकेतील कलाकारांविरोधात छळवणुकीची तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्या युट्यूब चॅनेलवर व्हिडीओ पोस्ट करत याची माहिती दिली आहे.

काय म्हणाले सुनील बर्वे?

अन्नपूर्णा विठ्ठल यांच्या वक्तव्यावर अखेर अभिनेता सुनील बर्वे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “मी अनेक वर्षांपासून या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे, पण माझ्यासोबत असा प्रकार कधीच घडला नाही. आमच्याबद्दल खोटं पसरवून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न का करत आहेत, हेच कळत नाहीय. मालिका सोडणं ही त्यांची निवड होती आणि आम्हाला त्याचे वाईट वाटले. पण, मालिका सोडल्यानंतर त्यांनी हा प्रकार का केला, असे व्हिडीओ का बनवले हे आम्हाला माहित नाही.’

अन्नपूर्णा यांचे आरोप काय?

अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल यांनी त्यांच्या युट्युब चॅनेलवर काही व्हिडीओ पोस्ट केले आहेत. या व्हिडीओत त्या म्हणाल्या, ‘मी अमराठी कलाकार असल्यामुळे मला सेटवर सतत त्रास दिला गेला. त्यांनी दिलेला त्रास सहन न झाल्यामुळे मला मालिका सोडावी लागली. मात्र, मालिका सोडल्यानंतर त्यांनी मला मालिकेतून काढलं अशी चर्चा सगळीकडे पसरविण्यात आली.’

या व्हिडीओत त्यांनी अभिनेता सुनील बर्वे, अभिनेत्री नंदिता पाटकर, किशोरी आंबिये यांच्यावरही आरोप केले आहेत. या कलाकारांनी मला मानसिक त्रास दिला. इतकेच नव्हेतर त्यांनी माझं रॅगिंग केलं, असं देखील अन्नपूर्णा म्हणाल्या. दिग्दर्शक देखील सेटवर मला घालून पाडून बोलायचे, म्हातारी म्हणायचे, असे त्या म्हणाल्या. अभिनेत्रीने मालिकेच्या निर्मात्याच्या विरोधात मानसिक त्रास आणि छळ केल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे. दादर पोलीस ठाण्यात 22 नोव्हेंबरला याबाबत लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा :

उफ्फ तेरी अदा…मौनी रॉयने सोशल मीडियावर शेअर केले ‘इनसाइड द बेडरूम’ फोटो!

Bigg Boss 15 | शॉकिंग! ‘बिग बॉस 15’मध्ये वाईल्ड कार्ड बनून एंट्री केलेले अभिजीत बिचुकले कोरोनाच्या विळख्यात!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI