Pm modi : संविधान दिवसाच्या पंतप्रधानांकडून देशवासियांना शुभेच्छा, पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री म्हणाले…

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान दिवसाच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत देशाला शुभेच्छा देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणाची एक प्रत पोस्ट केली आहे. 4 नोव्हेंबर 1948 च्या संविधान सभेतील भाषणातला हा मजकूर आहे.

Pm modi : संविधान दिवसाच्या पंतप्रधानांकडून देशवासियांना शुभेच्छा, पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री म्हणाले...
narendra modi


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान दिवसाच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संविधान तयार करण्यासाठी ज्या लोकांनी कठोर परिश्रम घेतले त्यांच्याविषयी आदर व्यक्त केला आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात आजच्या 26 नोव्हेंबर या दिवसाला एक वेगळं महत्व आहे. हा तोच दिवस आहे ज्या वेळी देश पारतंत्र्यातून बाहेर पडल्यानंतर स्वतंत्र भारतानं संविधान स्वीकारलं. याच दिवशी संविधान सभेनं संविधानाला मंजुरी दिली होती. देशात याच दिवसापासून संविधान लागू झाल्यानं आजचा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो.

संविधान दिवसादिवशी पंतप्रधान मोदींचं ट्विट

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत देशाला शुभेच्छा देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणाची एक प्रत पोस्ट केली आहे. 4 नोव्हेंबर 1948 च्या संविधान सभेतील भाषणातला हा मजकूर आहे, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान स्वीकारण्याचा प्रस्ताव संविधान समितीपुढे ठेवला होता. मोदींनी आपल्या ट्विटमध्ये लिहलं आहे की संविधान कितीही व्यवस्थित, सुंदर तयार केले असले तरी देशाचे खरे सेवक खंभीर, निस्वार्थी असल्याशिवाय संविधान काही करु शकत नाही म्हणत डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याविषयी आदर व्यक्त केला आहे.

गृहमंत्री आणि संरक्षण मंत्र्यांकडूनही शुभेच्छा

गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करत शुभेच्छा देताना म्हटलं आहे की, संविधान एकता आणि देशाच्या प्रगतीचा मुख्य आधार आहे. त्याचबरोबर त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना नमन करत आदर व्यक्त केला आहे. गृहमंत्र्यांबरोबरच संरक्षणमंंत्री राजनाथ सिंह यांनीही संविधान दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

भाजप ‘संविधान गौरव अभियान’ चालवणार

भाजप 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरपर्यंत देशभर संविधान गौरव अभियान चालवणार आहे. ज्यामध्ये यात्रा काढण्याबरोबर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येईल.

PHOTO | 9 वर्षांपूर्वी रुसून घर सोडलं, पुण्यात मिळेल ते काम केलं, आशा सोडलेल्या आई-वडिलांना व्हॉटसअ‍ॅप ग्रुपमुळे मुलगा परत मिळाला

Divorce | 2021मध्ये सेलिब्रिटी जोड्यांच्या नात्यात आला दुरावा, काहींचा झाला ब्रेकअप तर काहींचा घटस्फोट!

Health Tips For Depression | डिप्रेशन असल्यास या 4 गोष्टींचं सेवन चुकूनही करु नये

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI