JALGAON ACCIDENT : दुधाच्या ट्रकचा आणि टेम्पोचा भीषण अपघात, 5 मजुराचा जागीच मृत्यू

JALGAON ACCIDENT : दुधाच्या ट्रकचा आणि टेम्पोचा भीषण अपघात, 5 मजुराचा जागीच मृत्यू
दुधाच्या ट्रकचा आणि टेम्पोचा भीषण अपघात

घोडसगावच्या हायवे क्रमांक 6 वर झालेल्या या अपघातानंतर एकच खळबळ उडाली. दुध वाहून नेणारा ट्रक आणि टेम्पो यांच्यात जोरदार धडक होऊन पाच तरुण मजुरांचा मृत्यू झाला. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

रवी गोरे

| Edited By: महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

May 13, 2022 | 1:17 PM

जळगाव : जळगावात भीषण (Jalgaon Road Accident) अपघात झाला. या अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमधील चार जण हे धुळ्यातील (Dhule Accident News) आहेत. तर एक जण जळगावमधील आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ट्रक आणि टेम्पोची एकमेकांना जोरदार धडक बसली. ही धडक इतकी जबर होती की पाच जण जागीच दगावले. धक्कादायक बाब म्हणजे अपघाता आधी तीन वाहनांची विचित्र धडक झाली. त्यामुळे या अपघाताची तीव्र अधिकच वाढली. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरच्या (Muktainagar News) घोडसगाव इथं हा अपघात घडला. घोडसगावच्या हायवे क्रमांक 6 वर झालेल्या या अपघातानंतर एकच खळबळ उडाली. दुध वाहून नेणारा ट्रक आणि टेम्पो यांच्यात जोरदार धडक होऊन पाच तरुण मजुरांचा मृत्यू झाला. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नेमका हा अपघात कोणत्या कारणामुळे झाला याचा तपास आता पोलिसांकडून घेतला जातोय. दरम्यान, अपघातातील सर्व मृत मजूर हे तरुण असल्यानं त्यांच्या मृत्यूनं हळहळ व्यक्त केली जाते आहे. तर या विचित्र अपघातात ट्रक आणि टेम्पोचंही मोठं नुकसान झालंय.

मृतांमध्ये कुणाकुणाचा समावेश ?

ट्रक आणि टेम्पोच्या या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. त्यातील चौघे धुळ्यातील राहणारे असून एक जण जळगावातील राहणारा होता. मृतांची नावं पुढीलप्रमाणे –

पवन सुदाम चौधरी, वय 25
धनराज बन्सीलाल पाटील, वय 48
धनराज सुरेश सोनार, वय 37
उमेश राजेंद्र सोळंके, वय 35
भालचंद्र गुलाब पाटील, वय 31

नेमका अपघात कसा झाला?

दुधाने भरलेला टॅंकर अपघातात पलटी झाला होता. त्यामुळे पलटी झालेल्या दुधाच्या टँकरमधील दूध खाली करण्यासाठी एक ट्रक आला होता. यावेळी दूध खाली करण्याचं काम तरुण मजुरांकडून केलं जात होतं. कामादरम्यान, हे मजूर ट्रकवर बसले होतं. पण नेमक्या याच क्षणी एक भरधाव तिसरा ट्रक आला आणि त्यानं टेम्पोला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार आणि भीषण होती, की टँकरवर बसलेल्या पाचही तरुणाचा जागीच जीव गेला.

तरुण मजुरांच्या मृत्यूनं हळहळ

तरुण मजुरांच्या अपघाती मृत्यूनं जळगाव आणि धुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जाते आहे. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या अपघातानं रस्ते अपघातातील बळींचा वाढता आकडा काळजी वाढवणारा ठरतोय. एकीकडे रात्री घोडसगावात अपघात झाला, तर दुसरीकडे इतके मुंबई पुणे हायवेवरही ट्रेलर आणि टेम्पोची जोरदार धडक झाली. या अपघातानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, गेल्या 24 तासांत झालेल्या दोन भीषण अपघातांनी बेदरकारपणे वाहनं चालवणाऱ्यांना शिस्त कधी लागणार, असा प्रश्नही यानिमित्ता उपस्थित झालाय.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें