AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crime News : 12 मोटारसायकलीसह अट्टल चोरटे पोलिसांच्या ताब्यात, चोरी करायचे आणि…

दोघांची अजून चौकशी करण्यात येणार आहे. कारण दोघांनी अनेक गुन्हे केले असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दोघांनी चोरी केलेल्या बाईक त्या मालकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Crime News : 12 मोटारसायकलीसह अट्टल चोरटे पोलिसांच्या ताब्यात, चोरी करायचे  आणि...
jalgaon crime storyImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Mar 06, 2023 | 1:50 PM
Share

जळगाव : रावेर (Raver) तालुक्यातील सावदा येथून चोरीच्या तब्बल 12 दुचाकींसह दोन अट्टल चोरट्यांना सावदा पोलिसांनी (Savda Police) ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी (jalgaon crime news) त्याला ताब्यात घेतले असून चोरट्यांकडून दुचाकी चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. जावेद मुबारक तडवी (पातोंडा, ता.बर्‍हाणपूर) व मुनाफ मुबारक तडवी (कोळवद, ता.यावल) अशी केलेल्या आरोपींची नावं आहेत. नाकाबंदी असताना संशयास्पद काही गोष्टी आढळल्याने त्याची चौकशी केली. त्यावेळी त्याने उडवाउड़वीची उत्तर दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

नाकाबंदी सुरु होती, त्यावेळी पोलिसांनी काही मोटारसायकलींची चौकशी केली. त्यावेळी तिथं चौकशी करीत असताना पोलिसांनी संशय आहे. त्यावेळी संशयित जावेद मुबारक तडवी हा बाईक चालवत होता. त्याला अधिक चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांच्या अधिक बाईक चोरीच्या सापडल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

नाकाबंदी दरम्यान नेमकं काय घडलं…

सावद्याचे पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, हवालदार उमेश पाटील यांनी नाकाबंदी दरम्यान संशयित जावेद मुबारक तडवी (पातोंडा) याला विना क्रमांकाच्या दुचाकीसह पकडल्यानंतर त्याची सखोल चौकशी केली. त्यावेळी त्याने दुचाकी चोरीची असल्याची कबुली दिली. तसेच यााबाबत सावदा पोलिसात गुन्हा दाखल असल्याचे उघड झाल्याने आरोपीने आपला साथीदार मुनाफ मुबारक तडवी (कोळवद) असल्याची कबुली देत आतापर्यंत रावेर तालुक्यातील सावदा, रावेर, चोपडा, नेरी, ता.जामनेर, लालबाग, ता.बर्‍हाणपूर भागातून दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून आत्तापर्यंत 12 चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

दोघांची अजून चौकशी करण्यात येणार आहे. कारण दोघांनी अनेक गुन्हे केले असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दोघांनी चोरी केलेल्या बाईक त्या मालकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Follow Us
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल