AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुर्दैवाचे दशावतार… शेतात पत्नीला मारहाण, गावात पतीचा मृ्त्यू

अशोक ढगे यांच्या पत्नी कुसुम ढगे या त्यांच्या मुलासह, प्रतीक ढगे याच्यासह शेतामध्ये संत्र्याच्या झाडाला पाणी देण्यासाठी गेल्या होत्या. मात्र त्यावेळी त्यांच्या शेताशेजारी असणारे आरोपी वसंता ताडे यांनी क्षुल्लक कारणावरून मुलगा प्रतीक ढगे यास काठीने मारहाण केली. त्याचवेळी...

दुर्दैवाचे दशावतार... शेतात पत्नीला मारहाण, गावात पतीचा मृ्त्यू
पत्नीला मारहाण, गावात पतीचा मृ्त्यू,
| Updated on: Apr 08, 2025 | 11:22 AM
Share

शेतीच्या वादातून एका महिलेला मारहाण झाल्याची भयानक घटना जळगाव जवळ घडली. धक्कादायक गोष्ट म्हणजे आपल्या पत्नीला शेजाऱ्यानेच मारहाण आणि शिवीगाळ केल्याचे समजताच दुसरीकडे त्या महिलेच्या पतीला हार्ट अटॅक आला आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी आरोपी वसंत ताडे आणि इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. पण या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अशोक ढगे असे मृताचे नाव असून तो शेतकरी आहे. जळगाव जामोद पोलिस स्टेशन हद्दीतील सुनगाव येथील अशोक ढगे यांच्या पत्नीला शेजारच्या शेतकऱ्याने शेतीच्या वादातून मारहाण आणि शिवीगाळ केली. ती बातमी ढगे यांचा समजली आणि ती ऐकून त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्याच त्यांचा मृत्यू झाला.

शेतात झाडांना पाणी द्यायला गेल्या..

याप्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी आरोपी वसंत ताडे आणि इतर लोकांवर कलम ११८(१)११५(२),३५१(३),३५२,३(५) भारतीय न्याय संहिता सह कलम अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियम २०१६ चे कलम ९२(अ),९२(ब) अन्वये गुन्हा दाखल केलाय . मृतक शेतकरी अशोक ढगे यांचे सुनगाव शेत शिवारात शेती असून त्या शेतीचा वाद गेल्या कित्येक महिन्यापासून चालू आहे.

दरम्यान अशोक ढगे यांच्या पत्नी कुसुम ढगे या त्यांच्या मुलासह, प्रतीक ढगे याच्यासह शेतामध्ये संत्र्याच्या झाडाला पाणी देण्यासाठी गेल्या होत्या. मात्र त्यावेळी त्यांच्या शेताशेजारी असणारे आरोपी वसंता ताडे यांनी क्षुल्लक कारणावरून मुलगा प्रतीक ढगे यास काठीने मारहाण केली. त्याचवेळी त्याची आई कुसुम ढगे या मुलाला वाचवण्यासाठी मध्ये पडल्या मात्र वसंत ताडे यांनी अशोक ढगे यांच्या पत्नी कुसुम ढगे हिला सुद्धा शिवीगाळ करून मारहाण केली. ही संपूर्ण घटना अशोक यांना समजली. पत्नीला मारहाण झाल्याचे ऐकताच अशोक ढगे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचा दुर्दैवी मृत्य झाला. या दुर्दैवी घटनेमुळे सुनगावमध्ये हळहळ व्यक्त होत अलून ढगे कुटुंबावर तर शोककळा पसरली आहे.

पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Follow Us
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!
राष्ट्रवादीत फूट पडणार? दादांच्या गटातील 22 आमदार कधीही... -संजय राऊत
राष्ट्रवादीत मोठी फूट पडणार? दादांच्या गटाचे 22 आमदार कधीही... संजय राऊतांचं मोठं विधान