लग्नाआधीच सासरी येऊ लागला जावई, मुलीला अशी पट्टी पढवली की… नंतर भलतंच झालं!

राजस्थानच्या जोधपूरमध्ये असं काही घडलं की भावी जावयालाच अटक करण्यात आली. जोधपूरममधून ही एक विचित्र घटना समोर आली आहे. लग्न ठरल्यानंतर भावी नवरदेवानं मुलीला म्हणजेच त्याच्या भावी पत्नीला भेटण्यासाठी सासरी यायला सुरुवात केली. त्यानंतर काही दिवसातच भावी नवरदेवाला अटक करण्यात आलं. नेमकं काय घडलं? वाचा.

लग्नाआधीच सासरी येऊ लागला जावई, मुलीला अशी पट्टी पढवली की... नंतर भलतंच झालं!
लग्नापूर्वीच होणाऱ्या जावयाला अटक
| Edited By: | Updated on: Jan 03, 2025 | 12:28 PM

जोधपूरममधून ही एक विचित्र घटना समोर आली आहे. या ठिकाणी असं काही घडलं की भावी जावयालाच अटक करण्यात आली. लग्न ठरल्यानंतर भावी नवरदेवानं मुलीला म्हणजेच त्याच्या भावी पत्नीला भेटण्यासाठी सासरी यायला सुरुवात केली. मात्र  त्यानंतर अवघ्या काही दिवसांनीच भावी जावयालाअटक करण्यात आली. नेमकं काय घडलं?

राजस्थानच्या जोधपूरमधील लुणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोकलासानी गावातील ही घटना आहे. येथे राहणाऱ्या हेमा यांचे लग्न शेजारच्या गावातील जितेंद्रसोबत होणार होते. साखरपुडा झाल्यानंतर भावी नवरदेव जितेंद्र आपल्या होणाऱ्या वधू हेमाच्या घरी म्हणजेच सासरी यायचा. जावई आल्यावर घरच्यांनाही आनंद झाला. त्यामुळे त्याचे सासरी येणं वाढलं. पण  हा भावी नवरदेव तिथे कोणत्या उद्देशाने यायचा याची मुलीच्या घरच्यांना सुतराम कल्पना नव्हती.

मुलीच्या घरी म्हणजेच सासरी जितेंद्रचे वारंवार येणं वाढलं.  खरं तर याचदरम्यान नवरदेवानं त्याच्या भावी वधूला म्हणजेच हेमाला अशी पट्टी शिकवली की तिने घरातील सर्व दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली आणि ती जितेंद्रच्या हवाली केली.

घरातून दागिने चोरीला गेल्याने मुलीकडच्या लोकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. जेव्हा लक्षात आले की, चोर दुसरा तिसरा कोणीही नसून त्याच घरातील मुलगी आहे तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. होणाऱ्या पतीच्या नादी लागून मुलीने तिच्याच घरात चोरी केल्याचे समोर आल्याने सगळेच अवाक झाले.

या प्रकरणात पोलिसांनी 40 लाखांचे सोने आणि पावणेदोन लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. आता पुढील कारवाई करण्यात येत आहे.

पुण्यात रहायचे कुटुंबीय 

मोकलासानी गावात राहणारे प्रधानराम पुल्लर यांनी 21 नोव्हेंबर रोजी घरात चोरी झाल्याची तक्रार दिली होती. प्रधानराम हे कुटुंबासह पुण्यात राहतात, तर आई-वडील व बहीण गावातील वडिलोपार्जित घरात राहतात. या घरात एक तिजोरीही आहे, ज्यामध्ये अनेक किलो सोने आणि रोख रक्कम ठेवण्यात आली आहे. या तिजोरीची चावी हेमा यांच्या आईकडे होती. लग्न ठरल्यानंतर जितेंद्र अनेकदा हेमाच्या घरी आला. तिजोरी आणि त्यातील सामान जितेंद्रच्या लक्षात येताच त्याने हेमाला चोरीसाठी चिथावणी देण्यास सुरुवात केली.

कोणालाही खबरही लागली नाही अन त्याने डाव साधला

जितेंद्रने हेमा यांना लग्नानंतर स्वत:चे घर घेण्याचे स्वप्न दाखवले होते. त्यासाठी पैशांची गरज असल्याचे सांगून हेमा यांनी तिजोरीतून दागिने अनेकदा चोरून नेले. जितेंद्रने दागिन्याच्या बदल्यात पैसे घेतले होते. तिजोरीत भरपूर सोनं असल्याने सुरुवातीला कुणालाच याची माहिती नव्हती. परंतु 21 नोव्हेंबर रोजी ही चोरी पकडण्यात आली.