AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan Crime : जन्मदात्या आईनेच आखला लेकीच्या अपहरणाचा कट, मारहाणही केली… पण का ?

भररस्त्यात कार आडवी घालून रिक्षा थांबवली आणि चौघांनी रिक्षातील तरूणीला बाहेर खेचून तिला मारहाण केली. तसेच तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या आरड्याओरड्यामुळे पोलिस सावध झाले आणि त्यांनी धावत येऊन तरूणीची सुटका केली. मात्र अपहरण करणाऱ्यांचे नाव ऐकून पोलिसांनाही धक्का बसला.

Kalyan Crime : जन्मदात्या आईनेच आखला लेकीच्या अपहरणाचा कट, मारहाणही केली... पण का ?
| Updated on: Oct 03, 2023 | 12:07 PM
Share

कल्याण | 3 ऑक्टोबर 2023 : आपलं कुटुंब  हे आपली ताकद असते. त्यांच्या आधाराने आपण कोणत्याही संकटाचा सामना करू शकतो. कुटुंबियांच बळ पाठिशी असताना घाबरण्याची गरज पडत नाही कारण तेच आपली खरी ताकद असतात, अधिक मेहनत करण्यामागचं प्रोत्साहनही तेच असतात. पण घरातल्यांशी वाजलं किंवा भांडण झालं तर चैन पडत नाही. आपले कुटुंबीयच जर आपल्या वाईटावर असतील, त्यांनीच त्रास दिला तर ? बाहेरच्या शत्रूंपेक्षा घरातल्यांच्या वागण्याचा जास्त त्रास होऊ शकतो.

अशीच एक घटना कल्याण मध्ये घडली. कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक 25 वर्षीय तरुणीला भररस्त्यात मारहाण करून तिचे अपहरण करण्याचा (kidnapping case) प्रयत्न करण्यात आला. मात्र तिच्या ओरडण्यामुळे सतर्क झालेल्या नागिरकांनी आणि पोलिसांनी धाव घेत तिची सुटका केली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी 4 आरोपी विरोधात गुन्हा दाखल (crime news) केला आहे. एकाला ताब्यात घेण्यात आले असून इतरांचा शोध सुरू आहे. मात्र हे आरोपी कोण आहेत कळल्यावर जास्त दक्का बसला. त्या तरूणीच्या नातेवाईकांनीच तिचं अपहरण करण्याच प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.

नातेवाईकांनी का उचलले हे पाऊल ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरूणी ( वय २५) मूळची दिल्ली येथील असून सध्या ती कल्याणमधील नांदिवली परिसरात राहते. विठ्ठलवाडी येथील एका बारमध्ये ती गायिका म्हणून काम करते. १ ऑक्टोबर रोजी रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास बार बंद झाल्यास पीडित तरूणी रिक्षातून घरी जात होती. मात्र थोड्या वेळाने एक कार त्यांच्या रिक्षासमोर आडवी आली आणि कारमधून चार जण उतरले. रिक्षात बसलेल्या पीडित तरूणाला त्यांनी खाली खेचले आणि मारहाण सुरू केली.

एवढेच नव्हे तर त्यांनी त्या तरूणीला बळजबरीने कारमध्ये बसवत तिचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र पीडित तरूणीने त्यांना जोरदार विरोध करत आरडाओरडा सुरू केला. तिचा आवाज ऐकून रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांनी लगेच ती कार थांबवली आणि पोलिसांनाही माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सर्वांना ताब्यात घेतले.

कोळसेवाडी पोलिस ठाण्यात पोहोचल्यानंतर पोलिसांनी पीडित तरूणीचा जबाब घेत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला तसेच याप्रकरणी एकाला अटकही केली. पुढील कारवाई सुरू असून इतर आरोपींनाही लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. तरूणीचे अपहरण करणारे हे तिचेच नातेवाईक असल्याचे तपासादरम्यान समोर आले. त्यामध्ये तिच्या जन्मदात्या आईचा आणि बहिणीचाही समावेश असल्याचे समजते. मात्र ही वेळ नेमकी का आली, आईनेच मुलीचे अपहरण करण्याचा प्लान का आखला याचा पोलिस अजून तपास करत आहेत.

सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला.
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.