21 वर्षीय एअर होस्टेसने स्वत:ला संपवलं, मोबाईलमध्ये सापडलं असं काही की… महाराष्ट्र हादरला!

कल्याण पूर्वेत एका 21 वर्षीय एअर होस्टेसने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपी अजूनही मोकाट असल्याने मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे.

21 वर्षीय एअर होस्टेसने स्वत:ला संपवलं, मोबाईलमध्ये सापडलं असं काही की... महाराष्ट्र हादरला!
air hostess crime news
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 12, 2026 | 8:26 PM

Air Hostess Suicide Case : कल्याण पूर्वेत एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. 21 वर्षीय एअर होस्टेस असलेल्या तरुणीने आत्महत्या केली आहे. डिसेंबर महिन्यात तिन आत्महत्या केली होती. परंतु आता या तरुणीने नेमकी आत्महत्या का केली, याचे काही पुरावे समोर आले आहेत. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचं आमिष दाखवत लाखोंची आर्थिक फसवणूक आणि मारहाण केल्याचा दावा केला जातोय. तरुणीने आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच गंभीर आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. विशेष म्हणजे आता गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकाट फिरत असल्याने संतप्त कुटुंबीय आणि महिलांनी थेट पोलीस ठाण्यावर घेराव घालत मोठा गोंधळ घातला आहे.

21 वर्षीय एअर होस्टेसजी आत्महत्या

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस स्टेशन परिसरात एअर होस्टेस असलेल्या 21 वर्षीय तरुणीने 28 डिसेंबर रोजी आत्महत्या केली होती. प्रेमसंबंधांतील छळ आणि फसवणुकीला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलले, असे बोलले जात आहे. या प्रकरणात गुन्हा पीडित तरुणीच्या कुटुंबियांनी कल्याण कोळसवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात गुन्हा दाखल होऊनही पोलीस आरोपीला अटक करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी केला आहे. कौशिक प्रकाश पावशे असे आरोपीचे नाव आहे.

तरुणीच्या शरीरावर वृण आणि जखमा

पोलिसांच्या माहितीनुसार पीडित तरुणी आणि आरोपी कौशिक यांचे 2020 सालापासून प्रेमसंबंध होते. लग्नाचं वचन देत कौशिकने नेहासोबत शारीरिक संबंध ठेवले, वेळोवेळी मारहाण केली इतकेच नाहीतर फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून लाखो रुपये उकळण्यात आले, असा आरोप करण्यात आला आहे. आत्महत्या केलेल्या तरुणीची हैदराबादला बदली झाली होती. आरोपीने तिथे जाऊन तरुणीला मारहाण केल्याचे पुरावे समोर आले आहेत. 16 आणि 24 डिसेंबर दरम्यान तिच्या शरीरावर मारहाणीचे व्रण स्पष्ट दिसत होते. मृत्यूपूर्वीही तिच्याकडून मोठ्या प्रमाणात रक्कम घेतल्याचे बँक स्टेटमेंटमध्ये दिसून आल्याचे तरुणीच्या कुटुंबीयांचे मत आहे.

छळ, मारहाण, धमक्या आणि मानसिक अत्याचाराचे तपशील

विशेष म्हणजे आत्महत्येनंतर काही दिवसांनी तरुणीने आरोपीच्या बहिणीला पाठवलेले व्हॉट्सॲप मेसेज तरुणीच्या कुटुंबीयांच्या हाती लागले आहेत. या मेसेजमध्ये छळ, मारहाण, धमक्या आणि मानसिक अत्याचाराचे तपशील असल्याचं सांगण्यात आले आहे. मात्र गुन्हा नोंदवूनही आरोपीला अटक न झाल्यामुळे कुटुंबीय संतप्त झाले आहेत.

कल्याण पूर्व परिसरात तणावाचं वातावरण

दरम्यान आता पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी विशेष पथक रवाना केले असून चौकशीसाठी आरोपीच्या आईला ताब्यात घेतले आहे. आरोपीचा शोध सुरू केला आहे. मात्र या घटनेमुळे कल्याण पूर्व परिसरात तणावाचं वातावरण असून आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. आता पोलिसांची पुढील कारवाई काय होते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.