AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL चालू, तो फोनवर जोरात बोलला, थेट इमारतीवरून फेकलं खाली; तरुणाचा मृत्यू!

तापाच्या भरात घडलेला असाच एक अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार समोर आला आहे. आयपीएलचा सामना चालू असताना फोनवर जोरात बोलला म्हणून एका तरुणाने दुसऱ्या तरुणाला चक्क इमारतीवरून खाली फेकून दिलं आहे.

IPL चालू, तो फोनवर जोरात बोलला, थेट इमारतीवरून फेकलं खाली; तरुणाचा मृत्यू!
KANDIVALI YOUNG BOY MURDER
| Updated on: Apr 22, 2025 | 4:00 PM
Share

संताप माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतो, असं सर्रास म्हणतात. त्याची काही उदाहरणंही समोर आलेली आहेत. अनेकांनी रागाच्या भरात हादरवून टाकणारे कृत्य केल्याचं तुम्ही ऐकलं असेल. संतापाच्या भरात घडलेला असाच एक अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार समोर आला आहे. आयपीएलचा सामना चालू असताना फोनवर जोरात बोलला म्हणून एका तरुणाने दुसऱ्या तरुणाला चक्क इमारतीवरून खाली फेकून दिलं आहे. यात फोनवर बोलणाऱ्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सोमवारी (21 एप्रिल) हा धक्कादायक प्रकार समोर आला.

अफसर जमीरला केलं अटक

मिळालेल्या माहितीनुसार जितेंद्र चौहान असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. कांदिवलीच्या साईबाबा नगर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अफसर जमीर आलम नावाच्या 25 वर्षीय तरुणाला अटक केलं आहे. त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार जितेंद्र चौहान आणि अफसर जमीर आलम यांच्यात मोबाईलवर जोरात बोलण्यावरून वाद झाला. कांदिवलीच्या साईबाबानगरात दैवी इटर्निटी या इमारतीचे बांधकाम चालू आहे. त्यासाठीच्या कारपेंटिंगसाठी सी. जी. लाईफस्पेस या कंपनीकडून साधारण 12 ते 13 कामगार मागवण्यात आले होते. काम संपल्यानंतर रात्री हे सर्वजण इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आयपीएल क्रिकेटचे सामने पाहात बसले होते. यादरम्यान अफसर जमीरने जितेंद्रला तंबाखू मागितली होती. पण जितेंद्रने ती दिली नव्हती, यामुळे जमीर नाराज झाला होता.

जोराचा धक्का देत इमारतीच्या खाली लोटलं

त्यानंतर रात्री दहा वाजता जितेंद्र चौहान मोबाईल फोनवर बोलत होता. त्यावेळी जमीरने त्याला मोबाईलवर ओरडून बोलू नको, असे सांगितले. त्यानंतर या दोघांमध्ये वाद चालू झाला. इतरांनी मध्ये येऊन वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. दोघांनाही शांत केले. मात्र जितेंद्र उभा असताना अफसरणे त्याला जोराचा धक्का देत इमारतीच्या खाली लोटले. यातच जितेंद्रच्या मानेला जबर मार लागला. जितेंद्रला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सध्या अफसवर खुनाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...