हातगाडीवर झाले प्रेम! Bfसाठी पत्नी हैवान बनली, कानात विष टाकून… ही तर सोनम-मुस्कानपेक्षाही…

करीमनगर येथील रमादेवी नावाची विवाहित महिला तेलंगाणाचा प्रसिद्ध पदार्थ सर्वपिंडी विकत होती. तिच्या हातगाडीवर दररोज सर्वपिंडी खरेदी करण्यासाठी राजैया नावाचा माणूस येत असे. त्यानंतर जे घडले ते थक्क करणारे होते.

हातगाडीवर झाले प्रेम! Bfसाठी पत्नी हैवान बनली, कानात विष टाकून... ही तर सोनम-मुस्कानपेक्षाही...
Crime
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Aug 07, 2025 | 5:21 PM

देशात सतत पतींच्या हत्येच्या घटना समोर येत असतात. कोणती पत्नी हत्याराने मारते, तर कोणती विष देऊन पतीचा काटा काढते. पण आज आपण ज्या पत्नीबद्दल बोलत आहोत, तिने सोनम आणि मुस्कानकडून बरेच काही शिकले. तसं पाहायला गेले तर तीने प्रियकरासाठी पतीची कट रचून हत्या केली. पण या हत्याकांडामध्ये तिने सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. तिने जे काही केलं ते पाहून सर्वजण थक्क झाले. चला जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय?

तेलंगाणातील करीमनगरचे प्रकरण

करीमनगर येथील रमादेवी नावाची विवाहित महिला तेलंगाणाचा प्रसिद्ध पदार्थ सर्वपिंडी विकत होती. यावेळी तिच्या हातगाडीवर दररोज सर्वपिंडी खरेदी करण्यासाठी राजैया नावाचा माणूस येत असे. हळूहळू रमादेवी आणि राजैया यांच्यात जवळीक वाढली, दोघांमध्ये मैत्री झाली आणि ती मैत्री प्रेमात बदलली.

वाचा: माझं एका राजकीय नेत्याशी लग्न झालंय आणि…; चर्चांवर अखेर सोनाली कुलकर्णीनं सोडलं मौन

सोनम आणि मुस्कानकडून शिकले

या गोष्टीची कुणकुण रमादेवीचा पती संपत याला लागली. त्यानंतर रमादेवीने तिच्या प्रेमी राजैयासोबत मिळून पती संपतच्या हत्येची योजना आखली. पण रमादेवीला वाटले की, यापूर्वी ज्या पत्नींनी हत्या केल्या, त्या पकडल्या गेल्या. कारण हत्येसाठी वापरलेली हत्यारे मिळाली आणि विष देऊन मारल्याचाही पत्ता लागला. त्यामुळे रमादेवीने हत्येचा नवा मार्ग शोधला.

यूट्यूबवर हत्येचे मार्ग शोधले

रमादेवीने यूट्यूबवर हत्येचे मार्ग शोधायला सुरुवात केली. यावेळी तिला समजले की, जर एखाद्या व्यक्तीच्या कानात कीटकनाशक टाकले तर त्याचा मृत्यू होतो. त्यानंतर रमादेवीच्या प्रेमी राजैयाने संपतला एका पार्टीत बोलावले आणि त्याला भरपूर दारू पाजली. जेव्हा संपत दारूच्या नशेत पूर्णपणे धूत झाला, तेव्हा राजैयाने त्याच्या कानात कीटकनाशक औषध टाकले. मग जेव्हा संपतचा मृत्यू झाला, तेव्हा राजैयाने ही गोष्ट फोनवर रमादेवीला सांगितली.

अशी पकडली गेली पत्नी

रमादेवीने पोलिसांत तिच्या पतीच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली होती. पण रमादेवीचा डाव उलटला. रमादेवीची चूक ही झाली की तिने पोलिसांना सांगितले की तिच्या पतीचा मृतदेह सापडला आहे. यानंतर पोलिसांना रमादेवीवर संशय आला आणि तिला ताब्यात घेण्यात आले. कठोर चौकशीदरम्यान रमादेवी आणि राजैया यांनी आपला गुन्हा कबूल केला. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.