Chandrapur crime : चंद्रपूर शहर मनपा आयुक्तांच्या कक्षात चाकूहल्ला, लक्ष्मण पवार याने स्वतःवर केला हल्ला, जखमी रुग्णालयात दाखल

| Updated on: Aug 19, 2022 | 11:23 PM

लक्ष्मणनं स्वतःजवळील चाकू काढला. त्यानं स्वतःवरच चाकूहल्ला केला. चाकूचे तीन वार करत स्वतःला जखमी केले. हे सर्व पाहून आयुक्तही चकीत झाले.

Chandrapur crime : चंद्रपूर शहर मनपा आयुक्तांच्या कक्षात चाकूहल्ला, लक्ष्मण पवार याने स्वतःवर केला हल्ला, जखमी रुग्णालयात दाखल
लक्ष्मण पवार याने स्वतःवर केला हल्ला
Follow us on

चंद्रपूर शहर मनपा आयुक्तांच्या कक्षात एका  इसमाने स्वतःवर चाकूहल्ला केलाय. आयुक्त राजेश मोहिते कक्षात बसले असताना त्यांच्या ओळखीचा असलेला लक्ष्मण पवार नामक इसम कक्षात प्रवेश केला.  कक्षात लक्ष्मण पवार (Laxman Pawar) व आयुक्त दोघेच असताना या व्यक्तीने स्वतः वर चाकूने 3 वार करत स्वतःला जखमी केले. भेदरलेल्या आयुक्तांनी चपराशी व सुरक्षारक्षकांना जोराने आवाज देताच आतील दृश्य पाहून सर्व स्तब्ध झाले. तातडीने चंद्रपूर शहर पोलीस (City Police) ठाण्याच्या पथकाला पाचारण करत जखमीला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. लक्ष्मण पवार लातूर जिल्ह्यातील उदगीरच्या टाकळी येथील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात (District General Hospital) दाखल केले. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे घटनेचा अधिक तपास करीत आहे.

नेमकं काय घडलं

लक्ष्मण पवार हे मूळचे लातूर जिल्ह्यातील टाकळी येथील रहिवासी. ते मनपा आयुक्त राजेश मोहिते यांना भेटावयास आले. आतमध्ये दोघेचं बसले होते. त्यांच्यात काहीतरी बोलणं झालं. तेवढ्यात लक्ष्मणनं स्वतःजवळील चाकू काढला. त्यानं स्वतःवरच चाकूहल्ला केला. चाकूचे तीन वार करत स्वतःला जखमी केले. हे सर्व पाहून आयुक्तही चकीत झाले. त्यांनी चपराशी आणि सुरक्षा रक्षकांना बोलावलं. पोलिसांना कळविण्यात आलं. लक्ष्मण जखमी अवस्थेत होते. पोलिसांनी जखमीला रुग्णालयात दाखल केलं. जखमीची प्रकृती बरी आहे. जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

चाकूहल्ला करण्यामागचे कारण काय

या घटनेमुळं चंद्रपूर मनपा कार्यालयात चर्चांना उधाण आलं. हल्ला कशासाठी केला. आयुक्तांसोबत काही भांडण झालं का. आतमध्ये नेमकं काय घडलं, याची उत्तरं आयुक्त किंवा जखमी लक्ष्मण देऊ शकेल. याचा तपास पोलीस करत आहेत. पण, हे का घडलं असावं, यामागची कारण काय, हे तपासानंतरच कळेल. पण, आयुक्त कार्यालयात घडलेल्या घटनेनं परिसर हादरला.

हे सुद्धा वाचा