AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Human Library : नागपुरात सुरू होतेय पहिली ह्युमन लायब्ररी, ‘रूबरू’चे उद्या उद्‌घाटन, रविवारी होणार वाचन

ह्युमन लायब्ररी म्हणजे, एखाद्या व्यक्तीने पुस्तक होऊन स्वत:च्या आयुष्यातील एखादी घटना, अनुभव, वाटचाल, संघर्ष कथन करणे. त्यातून आलेले आकलन आणि बदललेले आयुष्य याविषयी मनोगत व्यक्त करणे होय.

Nagpur Human Library : नागपुरात सुरू होतेय पहिली ह्युमन लायब्ररी, 'रूबरू'चे उद्या उद्‌घाटन, रविवारी होणार वाचन
नागपुरात सुरू होतेय पहिली ह्युमन लायब्ररी, 'रूबरू'चे उद्या उद्‌घाटन
| Updated on: Aug 19, 2022 | 10:47 PM
Share

नागपूर : जगभरात नावारूपास आलेली आणि भारतातील निवडक शहरांत सुरू असलेली ‘ह्युमन लायब्ररी’ ही संकल्पना नागपुरातही सुरू होत आहे. नागपूरच्या या ‘रूबरू ह्युमन लायब्ररी’चे उद्‌घाटन येत्या उद्या, शनिवारी सायंकाळी 5 वाजता श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह (Dhanwate Auditorium), वोक्हार्ट हॉस्पिटलच्या मागे, शंकरनगर येथे होत आहे. ‘रूबरू’च्या या उद्‌घाटन सोहळ्याच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक व सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया अय्यर (Supriya Iyer) या राहतील. ठाणे येथील ज्येष्ठ साहित्यिक विक्रम भागवत (Vikram Bhagwat) हे प्रमुख अतिथी राहतील. यावेळी एका बुकचा ‘ब्लर्ब’देखील सादर केला जाणार आहे. उद्‌घाटन सोहळ्याच्या दुसऱ्याच दिवशी, 21 ऑगस्ट रोजी तारकुंडे धरमपेठ माध्यमिक शाळा, उत्तर अंबाझरी मार्ग, अलंकार टॉकीजजवळ येथे पाच ह्युमन बुकचे वाचन होणार आहेत. दुपारी 3 वाजता ते सायंकाळी 6 वाजतापर्यंत या बुक्सचे वाचन होईल. यात व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात सक्रिय असलेले तुषार नातू यांचे ‘… त्या दिवशी मी रॉकबॉटमला पोहोचलो’, एलजीबीटीक्यू समुदायासाठी झटणाऱ्या निकुंज जोशी यांचे ‘माझी लैंगिकता आणि मी’, बाइक रायडर आणि ट्रॅव्हलर स्नेहल वानखेडे यांचे ‘रास्ता… सफर और जिंदगी’, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या रुबिना पटेल यांचे ‘और मैने मेहेर माफ किया…’ आणि कॅन्सरच्या जनजागृतीसाठी सक्रिय असलेले रणजित उंदरे यांचे ‘त्याने जिंकले कॅन्सरचे रण’ हे ह्युमन बुक सदस्यांसाठी सादर होणार आहे.

ह्युमन लायब्ररीची संकल्पना काय

ह्युमन लायब्ररी म्हणजे, एखाद्या व्यक्तीने पुस्तक होऊन स्वत:च्या आयुष्यातील एखादी घटना, अनुभव, वाटचाल, संघर्ष कथन करणे. त्यातून आलेले आकलन आणि बदललेले आयुष्य याविषयी मनोगत व्यक्त करणे होय. विशेष म्हणजे, यावेळी उपस्थितांना पुस्तकांना प्रश्नही विचारता येणार आहे.

ह्युमन लायब्ररी सुरुवात कशी झाली

पहिली मानवी लायब्ररी उघडली ती डेन्मार्कमध्ये. माणसांची लायब्ररी ही रॉनी एबरगेल, त्याचा भाऊ डॅनी आणि काही सहकाऱ्यांनी मिळून कोपेनहेगेन नावाच्या शहरात सुरू केली. हिंसाचारासंबंधी जनजागृती करणे हा त्या ह्युमन लायब्ररीचा मुख्य उद्देश होता. एका नावाजलेल्या डॅनिश फेस्टिव्हलमध्ये ही विलक्षण लायब्ररी सलग चार दिवस सक्रिय होती. पहिल्याच प्रयत्नात या लायब्ररीला जवळजवळ हजार वाचकांनी भेट दिली. तिथूनच या अभिनव कल्पनेची सुरुवात झाली. बघता बघता सहा खंडांत आणि ऐंशीहून अधिक देशांमध्ये ही लायब्ररी पोहोचली. भारतात पहिली ह्युमन लायब्ररी सुरू झाली ती इंदूरमध्ये. नंतरच्या काळात दिल्ली, मुंबई, चेन्नई, हैदराबाद येथेही ती सुरू करण्यात आली आणि आता नागपूरमध्ये सुरू होत आहे.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.