Kolhapur Murder : कोल्हापूर हादरलं! तरुणाचा पाठलाग करुन सपासप वार करत खून

कोल्हापूर जिल्ह्यातील टोळीयुद्धातून घडलं थरारक हत्याकांड

Kolhapur Murder : कोल्हापूर हादरलं! तरुणाचा पाठलाग करुन सपासप वार करत खून
टोळीयुद्धातून हत्याकांडImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 14, 2022 | 9:08 AM

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये एका 22 वर्षांच्या तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार करत त्याचा खून (Kolhapur Murder News) करण्यात आला. या घटनेनं कोल्हापूरमध्ये एकच खळबळ उडालीय. हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव कुमार शाहूराज गायकवाड (Kumar Shahuraj Gaikwad) असं आहे. राजेंद्रनगर (Rajendra Nagar, Kolhapur crime News) येथे राहणाऱ्या कुमारची टोळीयुद्धातून हत्या करण्यात आली असल्याचं समोर आलंय. रविवारी रात्रीच्या सुमारास कुमारचा पाठलाग करुन त्याच्यावर तब्बल 20 वार करण्यात आले होते.

कुमार गायकवाड हा तरुण आपल्या मामाकडे राहत होता. नुकताच कुमारचा राजेंद्र नगर परिसरात एका टोळीतील तरुणांशी वाद झालेला. या वादातूनच विरोधी टोळीतील तरुणांनी कुमारच्या हत्येचा कट रचल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

कुमार एका मॉलजवळ थांबला असता विरोधी टोळीतील काही तरुण आले. आपल्यावर हल्ला होण्याच्या भीतीने कुमारने घटनास्थळावरुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण हल्लेखोरांना कुमारचा पाठलाग करत त्यांच्यावर सपासप वार केले.

हे सुद्धा वाचा

कुमार उड्डाणपुलाकडून टाकाळा खणीच्या दिशेने पळाला होता. त्यादरम्यान, काही तरुणांनी कोयत्यासह एडक्याने कुमारवर हल्ला केला. कुमारचा चेहरा, हात, डोकं आणि छातीवर हल्लेखोरांनी सपासप वार केले. गंभीर स्वरुपाचे तब्बल 20 वार करत कुमारची हत्या करण्यात आली.

बराच वेळ कुमार घरी आला नाही म्हणून त्याच्या मामाने फोन केला. कुमार फोन उचलत नाही म्हणून अखेर शोध सुरु झाला. या दरम्यान, कुमार एके ठिकाणी गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. रस्त्याच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या कुमारला घेऊन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्याआधीच त्याचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आणि सगळ्यांना धक्काच बसला.

या खळबळजनक घटनेनंतर सीपीआर रुग्णालयाबाहेर एकच गर्दी जमली होती. कुमार हा आपल्या मामाचा व्यवसाय सांभाळत होता. कुमारनेही तरुणांचा एक गट तयार केला होता. खुनाच्या या घटनेनंतर कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत बंदोबस्त वाढवला.

या घटनेची कोल्हापूर पोलिसांनी गंभीर दखल घेतलीय. कोल्हापूर क्राईम ब्रांच पोलिसांकडून या घटनेची तपास केला जात असून या हत्येप्रकरणी आरोपींना अटक केव्हा केली जाते, हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.