Kunal Kamra : कुणाल कामराच्या घरी पोहचले मुंबई पोलीस, कॉमेडियन म्हणाला ‘वेस्ट युवर टाईम …’
Kunal Kamra : महाराष्ट्रातील राजकारण्यांवर केलेल्या विडंबनात्मक टीकेनंतर कॉमेडियन कुणाल कामरा चौकशीसाठी हजर न राहिल्याने मुंबई पोलिस आता त्याच्या घरी पोहोचले आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ देखील समोर आला आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात पॅरीडी गाण्यातून टीका केल्यानंतर कॉमेडियन कुणाल कामरा याच्या अडचणी वाढल्या आहेत. कुणाल कामरा याचा शो व्हायरल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ स्टुडिओत जाऊन तोडफोड करण्यात आली आहे. त्यानंतर कुणाल कामरा याच्या विराधात मुंबईच्या खार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. अखेर खार पोलिसांनी कामरा याला जबाब नोंदविण्यासाठी पाचारण केले. परंतू त्याने येण्यास, नकार दिल्याने मुंबई पोलीस कामरा याच्या दादर येथील निवासस्थानी गेली आहे. याचा व्हिडीओ एएनआय वृत्तसंस्थेने व्हायरल केला आहे. परंतू यावर आता कुमाल कामराने पोस्ट केली आहे.
येथे पोस्ट पाहा –
#WATCH | Comedian Kunal Kamra row: A team of Mumbai Police arrives at the residence of Kunal Kamra in Mumbai
More details awaited pic.twitter.com/oSdph3kKOh
— ANI (@ANI) March 31, 2025
कुणाल कामरा याच्यावर अनेक केसेस
शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांच्या तक्रारीनंतर २४ मार्च रोजी कामरा याच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कुणाल कामरा याला दोनदा समन्स बजावण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांच्या मते कामरा याच्याविरोधात खार पोलिस ठाण्यात तीन वेग-वेगळ्या केस दाखल झाल्या आहेत. एक तक्रार जळगावातील महापौरांनी दाखल केली आहे. अन्य दोन केसेस नाशिकचे हॉटेल व्यावसायिक आणि एक व्यापाऱ्यांनी दाखल केल्या आहेत.
कुमार कामरा याने त्याच्या मुंबईतील दादर येथील घरात पोलिसांचे पथक गेल्याचे कळल्यावर आता कुमाल कामराने पोस्ट केली आहे. ज्या घरात मी गेली दहा वर्षे रहात नाही. तेथे पोलीस पोहचले आहे वेस्ट युवर टाईम एण्ड रिसोर्सेस असे त्याने पोस्ट करीत म्हटले आहे.
मैं तुम्हारा यहा इंतजार कर रहा हूँ , पोस्ट पहा –
Going to an address where I haven’t lived for the last 10 Years is a waste of your time & public resources… pic.twitter.com/GtZ6wbcwZn
— Kunal Kamra (@kunalkamra88) March 31, 2025
काय आहे प्रकरण
23 मार्च रोजी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने साल १९९७ चा चित्रपट ‘दिल तो पागल है’ मधील एका गावाचा पॅरीडी साँग तयार करुन त्यातून एकनाथ शिंदे यांना डिवचले. त्यानंतर या प्रकरणात शिवसैनिकांना कुणाल कामरा याने माफी मागावी अशी मागणी लावून धरली,त्याच्या काही मिनिटांच्या आतच हॉटेल मध्ये जाऊन सेटची तोडफोड केली. त्यानंतर काही दिवसांना हॅबिटेट स्टुडिओच्या काही भागाचे बांधकाम बीएमसीच्या पथकाने जाऊन पाडले.
