आग्रा : आग्रा येथे एक धक्कादायक (Shocking) घटना घडली. एक महिला प्रियकरासाोबत लिव्ह इनमध्ये ( live in) राहत होती. तिची पतीने बहिणीसोबत मिळून हत्या केली. रितिका नावाची महिला तिच्या पतीला आपत्तीजनक स्थितीत सापडली. ती प्रियकराच्या मिठीत असलेली पाहून अमितचं डोकं सटकलं. त्याच्यासोबत असलेल्या बहिणीच्या मदतीनं त्यानं तिचे हातपाय बांधले. तिचा प्रियकर तिथं हे सारं पाहत होता. त्याच्यासमोरच रितिकाचे हातपाय बांधले. त्यानंतर तिला उलचून नेले. रितिकाला ओम श्री अपार्टमेंच्या चौथ्या माळ्यावरून खाली फेकले. त्यात रितिकाचा जीव गेला. पोलीस घटनेचा तपास करत आहेत. याप्रकरणी रितिकाचा नवरा व त्याच्या बहिणीला पोलिसांनी (police) अटक केली आहे.