जेलमध्ये दीड लाखांची चप्पल, 80 हजारांची जीन्स.. छापा पडताच ढसाढसा रडू लागला जॅकलिनचा एक्स बॉयफ्रेंड सुकेश चंद्रशेखर

या छापेमारीचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओ सुकेश ढसाढसा रडताना दिसतोय. जेलर दीपक शर्मा आणि जयसिंह यांनी CRPF सोबत ही छापेमारी केली. छापेमारी संपल्यानंतर त्यांच्यासमोर सुकेश रडू लागला.

जेलमध्ये दीड लाखांची चप्पल, 80 हजारांची जीन्स.. छापा पडताच ढसाढसा रडू लागला जॅकलिनचा एक्स बॉयफ्रेंड सुकेश चंद्रशेखर
Jacqueline Fernandez and Sukesh Chandrasekhar
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 23, 2023 | 12:58 PM

नवी दिल्ली : 200 कोटी रुपयांच्या खंडणी आणि मनी लाँड्ररिंग प्रकरणात आरोपी सुकेश चंद्रशेखर सध्या मंडोली तुरुंगात आहे. सुकेशच्या सेलमध्ये प्रशासनाने छापेमारी केली आणि या छापेमारीत धक्कादायक गोष्टी उघड झाल्या. सुकेशच्या सेलमधून दीड लाख रुपयांची चप्प, 80 हजार रुपयांचे दोन जीन्स आणि इतरही महागड्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. या छापेमारीचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओ सुकेश ढसाढसा रडताना दिसतोय. जेलर दीपक शर्मा आणि जयसिंह यांनी CRPF सोबत ही छापेमारी केली. छापेमारी संपल्यानंतर त्यांच्यासमोर सुकेश रडू लागला.

तुरुंगात सुकेशच्या सेलमध्ये जे सामान मिळालं, ते पाहून अधिकारीसुद्धा थक्क झाले आहेत. सुकेशकडे Gucci या महागड्या ब्रँडची दीड लाख रुपयांची चप्पल आणि 80 हजार रुपये किंमतीचे दोन जीन्स मिळाले. दिल्ली पोलिसांनी सुकेशला 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर त्याला तिहार तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. मात्र तिहार तुरुंगातही त्याने अधिकाऱ्यांना लाच देऊन अनेक बेकायदेशीर गोष्टी केल्या होत्या. सुकेश तुरुंगात राहून विविध अभिनेत्रींची भेट घेत होता आणि त्यांच्याशी फोनवर बोलत होता.

सुकेश चंद्रशेखर प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं 134 पानी तिसरी सप्लीमेंट्री चार्जशीट दाखल केली होती. या चार्जशीटमध्येही अनेक खुलासे झाले. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं याप्रकरणाचा तपास केला होता. त्यांच्या मते तुरुंगातील सगळा स्टाफ हा सुकेशकडून लाच घेत होता. अगदी वरपासून खालपर्यंत सर्वांना लाच देऊन सुकेशने त्याची कामं करून घेतली होती.

छापेमारीचा CCTV व्हिडीओ

चार्जशीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, तुरुंगात वर्षभर त्याच्याकडे मोबाइल फोन होता. आयफोन 12 प्रो आणि आयफोन 11 असे दोन फोन त्याच्याकडे होते आणि याच फोन्सच्या माध्यमातून तो बाहेरची सुत्रं नियंत्रणात ठेवत होता. वर्षभरात त्याने एका व्यावसायिकाच्या पत्नीकडून तब्बल 200 कोटी रुपये वसूल केले होते.

या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांचीही नावं समोर आली. जॅकलिनने तिच्या जबाबात म्हटलंय, “सुकेश माझ्या भावनांशी खेळला आणि त्याने माझं आयुष्य, करिअर उद्ध्वस्त केलं आहे. त्याने माझी फसवणूक केली.” सुकेश चंद्रशेखरच्या प्रकरणात सध्या जॅकलिन आणि नोरा या दोघींची चौकशी सुरू आहे. या दोघींवर सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेतल्याचा आरोप आहे.