शर्यत कसली ? बैलगाडाची की मानाच्या गदा चोरीची, आमदारांच्या डोक्याला नको तो ताप

अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडजवळ बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या शर्यतीदरम्यान धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

शर्यत कसली ? बैलगाडाची की मानाच्या गदा चोरीची, आमदारांच्या डोक्याला नको तो ताप
बैलगाडा शर्यतीदरम्यान मानाच्या गदा चोरीला
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 25, 2023 | 4:13 PM

अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील खरड गावात भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या नावाने आमदार केसरी बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र बक्षीस वितरणाच्या दरम्यान मानाच्या गदा चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी संधी साधली आणि चोरी केली. या घटनेमुळे ऐन कार्यक्रमात एकच खळबळ उडाली. यानंतर आयोजकांनी चोरलेल्या गदा परत करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र चोरट्यांनी चोरलेल्या गदा परत न केल्यानं आयोजकांनी आवाहन केले आहे. आवाहनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बक्षीस म्हणून ठेवलेल्या मानाच्या गदा चोरीला

पावसाळ्याआधी बैलगाडा शर्यतींचा अंतिम टप्पा ग्रामीण भागात सुरू आहे. मलंगगड भागातील खरड गावात भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या नावाने आमदार केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या स्पर्धेत बक्षीस म्हणून ठेवण्यात आलेल्या मानाच्या गदा चोरीला गेल्यानं सध्या आयोजकांनी आवाहन केलेले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

शर्यतीच्या स्टेजवरुन 10 ते 12 गदा चोरीला

अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या खरड गावात बुधवारी या बैलगाडा शर्यती पार पडल्या. काकडवाल गावातील निलेश कान्हा पावशे यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या बैलगाडा शर्यतीच्या स्टेजवरून दहा ते बारा मानाच्या गदा चोरीला गेल्याची घटना घडली. यानंतर आयोजकांनी ज्यांनी गदा चोरून नेल्या असतील, त्यांनी परत आणून द्याव्यात, असं आवाहन सुद्धा केलं. मात्र कुणीही गदा परत आणून दिल्या नाहीत. याबाबत अद्याप पोलिसात कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.