
प्रेमात आतापर्यंत तुम्ही मुलाने मुलीला घरातून पळवून नेल्याबद्दल ऐकलं असेल. पण मुलीने मुलाला घरातून पळवल्याच क्वचितच ऐकलं असेल. अशी घटना घडली आहे. ही अजब प्रेमाची गजब कहानी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळची आहे. इथे एका 28 वर्षाच्या महिलेला तिच्यापेक्षा वयाने 11 वर्षाने लहान असलेल्या मुलासोबत प्रेम झालं. त्याला आपल्या जाळ्यात अडकवून महिला त्या मुलाला आपल्यासोबत घेऊन गेली. मुलगा अल्पवयीन होता. त्याच्या कुटुंबान महिलेवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सुद्धा जागोजागी दोघांचा शोध घेतला. अखेर दोन महिन्यांनी मुलगा घरी आला. पण त्यावेळी तो अल्पवयीन नव्हता, तो सज्ञान झालेला.
नारियलखेड़ा निवासी किशोर एका सोनाराच्या दुकानात काम करायचा. त्याच दुकानात द्वारिका नगरमध्ये राहणारी एक महिला कॉम्प्युटर ऑपरेटर होती. एकत्र काम करताना दोघांमध्ये जवळीक वाढली. त्यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. 30 जूनच्या रात्री किशोरने आईला सांगितलं की, मी मैत्रिणीच्या घरी चाललोय.
रक्षाबंधनाच्या दिवशी घरी आला
त्यानंतर किशोरचा फोन बंद झाला. नातेवाईकाचा किशोरशी संपर्क झाला नाही. पण त्यांनी अपहरणाची तक्रार नोंदवली. पोलिसांनी महिलेला सुद्धा शोधण्याचा प्रयत्न केला. पण ती बेपत्ता होती. तीन ऑगस्टला मुलगा सज्ञान झाला. रक्षाबंधनाच्या दिवशी घरी आला. त्याने पोलिसांना सांगितलं की, तो त्याच्या मर्जीने महिलोसोबत इंदूरमध्ये राहत होता.
कायदेशीर कारवाईवर मर्यादा का?
दोन दिवसांनी महिला किशोरच्या घरी गेली. ती तिथेच राहू लागली. महिलेने किशोरच्या कुटुंबियांना सांगितलं की, मी त्याच्यावर प्रेम करते. आम्ही सोबत राहणार. ज्यावेळी सर्वकाही ठिकठाक होईल, तेव्हा म्हणजे अजून तीन वर्षांनी मी किशोरसोबत लग्न करीन. महिलेवर किशोरच्या अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. पण किशोर आता सज्ञान असल्याने कायदेशीर कारवाईवर मर्यादा आल्या आहेत.
ही आमचीच सून बनणार, पण…
पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याच म्हणणं आहे की, किशोर मेडिकल चाचणीसाठी तयार नाहीय. मुलाची आई सुद्धा तिला घरी नांदवायला तयार आहे. फक्त एकच अट आहे. ही आमचीच सून बनणार, पण 3 वर्षानंतर. किशोरच्या बहिणीला मारहाण केल्याप्रकरणी महिलेला अटक करुन तुरुंगात पाठवण्यात आलय.