AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cough Syrup Death : विषारी कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक, आतापर्यंत 20 बालकांचा मृत्यू

Cough Syrup Death : रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी रंगनाथन गोविंदन यांच्यावर 20 हजार रुपयांच इनाम जाहीर केलेलं. रंगनाथन गोविंदन हे चेन्नई येथील आपलं घर आणि कांचीपुरम तमिळनाडू येथील फॅक्टरीला टाळं लावून पत्नीसोबत फरार झालेले.

Cough Syrup Death : विषारी कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक, आतापर्यंत 20 बालकांचा मृत्यू
cough syrup company owner arrested
| Updated on: Oct 09, 2025 | 9:02 AM
Share

सध्या देशात कफ सिरपमुळे लहान मुलांच्या झालेल्या मृत्यूच प्रकरण गाजत आहे. हा विषारी कफ सिरप ‘कोल्ड्रिफ’ बनवणारी कंपनी श्रीसन फार्माचे मालक रंगनाथन गोविंदन यांना MP SIT ने अटक केली आहे. रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी रंगनाथन गोविंदन यांच्यावर 20 हजार रुपयांच इनाम जाहीर केलेलं. रंगनाथन गोविंदन हे चेन्नई येथील आपलं घर आणि कांचीपुरम तमिळनाडू येथील फॅक्टरीला टाळं लावून पत्नीसोबत फरार झालेले. मिळालेल्या माहितीनुसार, विषारी कफ सिरप कोल्ड्रिफ पिऊन 20 निष्पापांचा मृत्यू झाल्यानंतर छिन्दवाडाच्या परासिया पोलीस ठाण्यात 5 ऑक्टोंबरला औषध निर्माता कंपनी श्रीसन फार्माच संचालक मंडळ, बालरोजतज्ज्ञ डॉक्टर प्रवीण सोनी आणि अन्य जबाबदार व्यक्तींविरोधात कलम 105,276 व ड्रग्स एंड कॉस्मेटिक एक्ट 1940 च्या कलम 27a अंतर्गत गुन्हा दाखल केला.

बालरोजतज्ज्ञ डॉक्टर प्रवीण सोनी यांना पोलिसांनी आधीच अटक केली होती. पण अन्य अटका झाल्या नव्हत्या. औषध निर्माता कंपनीच्या मालकाच्या अटकेसाठी छिन्दवाड़ा एसपी अजय पांडे यांनी 12 सदस्यीय SIT ची स्थापना केलेली. पोलीस सूत्रांनुसार, SIT टीम रंगनाथन यांना चेन्नईवरुन भोपाळला घेऊन जात आहे. तिथे कफ सिरप निर्माण, कच्चा मालाचा पुरवठा, वितरण नेटवर्क आणि लायसन्सशी संबंधित अनियमितता याची चौकशी केली जाईल. सिरपमध्ये घातक केमिकलचा कसा समावेश करण्यात आला? कंपनीच्या क्वालिटी तपास प्रक्रियेत इतकी गंभीर चूक कशी झाली? याचा शोध घेण्यात येईल.

या घटनेने मोठी खळबळ

कोल्ड्रिफ नावाच्या या कफ सिरपच्या सेवनाने मध्य प्रदेशात 20 बालकांचा मृत्यू झाला. संपूर्ण राज्यात या घटनेने मोठी खळबळ उडाली. आरोग्य विभागाने तात्काळ विक्रीवर बंदी घातली. संबंधित कंपनी विरोधात एफआयआर नोंदवून तपास सुरु केला. या घटनेने औषधांच्या सुरक्षेच्या निकषांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

चेन्नई येथील अपार्टमेंटमधून ताब्यात घेतलं

अटक टाळण्यासाठी रंगनाथन मागच्या अनेक दिवसांपासून फरार होते. पोलिसांनी त्यांच्यावर इनाम जाहीर करुन तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात अनेक आठवड्यांपासून शोधमोहिम सुरु होती. याच प्रकरणात स्थापन झालेल्या SIT ने इलेक्ट्रॉनिक सर्विलांस आणि स्थानिक सुत्रांच्या मदतीने आरोपींचा शोध लावला. त्यांना चेन्नई येथील अपार्टमेंटमधून ताब्यात घेतलं.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!