कुठून आला इतका द्वेष? इलेक्ट्रिशियनच्या छातीत 13 वेळा खंजीर खुपसला, जीव गेल्यावरच मारेकरी थांबला

ग्वाल्हेरमधील मुरार भागातील भगवती कॉलनी परिसरात राहणाऱ्या 46 वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली. मयत गणेश शर्मा हा व्यवसायाने इलेक्ट्रिशियन होता.

कुठून आला इतका द्वेष? इलेक्ट्रिशियनच्या छातीत 13 वेळा खंजीर खुपसला, जीव गेल्यावरच मारेकरी थांबला
मध्य प्रदेशात ग्वाल्हेरमध्ये हत्या
| Edited By: | Updated on: Dec 02, 2021 | 12:36 PM

ग्वाल्हेर : अंगाचा थरकाप उडवणारी एक घटना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून समोर आली आहे. मारेकऱ्यांनी एक-दोन वेळा नाही, तर तब्बल 13 वेळा इलेक्ट्रिशियनच्या छातीत सुरा खुपसला. पोलिसांनी अनैतिक संबंध आणि कर्ज या दृष्टीने तपास सुरु केला आहे.

काय आहे प्रकरण?

ग्वाल्हेरमधील मुरार भागातील भगवती कॉलनी परिसरात राहणाऱ्या 46 वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली. मयत गणेश शर्मा हा व्यवसायाने इलेक्ट्रिशियन होता. मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास तो घरातून बाहेर पडला, मात्र दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तो घरी न परतल्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध करण्यास सुरुवात केली. भाजी विक्रेते बसत असलेल्या ठिकाणी गणेशचा मृतदेह आढळला. त्यानंतर मुरार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गणेश अविवाहित असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली.

छातीवर एकामागून एक 13 वार

मुरार पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी पोहोचून तपास केला असता हल्लेखोरांनी गणेशची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले. हल्लेखोराच्या मनात गणेशाबद्दल इतका द्वेष होता की त्याने खंजीराने त्याच्या छातीवर एकामागून एक 13 वार केले. गणेशचे काही महिलांशी जवळीक असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मुरारचे टीआय शैलेंद्र भार्गव यांनी सांगितले की, अनैतिक संबंधातून खून झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. गणेश व्याजाने पैसेही देत होता. त्यामुळे या व्यवहारांमुळेही हत्येची शक्यता झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

अनैतिक संबंधातून हत्येचा संशय

गणेशने काही जणांना व्याजावर कर्ज दिल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच मुरार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हल्लेखोराच्या मनात गणेशबद्दल प्रचंड द्वेष होता, असा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. यामुळेच त्याच्या छातीत खंजीर खुपसून त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिस अवैध संबंध, व्याज आणि इतर अंगांनी तपास करत आहेत.


संबंधित बातम्या :

सासरी निघालेल्या नववधूवर गाडीतच गोळीबार, एक्स बॉयफ्रेण्डवर संशय