सासरी निघालेल्या नववधूवर गाडीतच गोळीबार, एक्स बॉयफ्रेण्डवर संशय

नववधूचा एक्स बॉयफ्रेण्ड आणि त्याच्या साथीदारांनी हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.

सासरी निघालेल्या नववधूवर गाडीतच गोळीबार, एक्स बॉयफ्रेण्डवर संशय
मॅट्रिमोनी साईट्सवर तब्बल 41 महिलांची फसवणूक करणाऱ्या लखोबा लोखंडेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

चंदिगढ : लग्नानंतर सासरी निघालेल्या नववधूवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नवदाम्पत्याची कार ओव्हरटेक करुन थांबवण्यात आली. त्यानंतर नवरदेवाला खाली उतरवण्यात आलं, तर नववधूच्या गळ्यावर गोळी झाडण्यात आली. नवरदेवाच्या भावाची सोन्याची चेन लुटून हल्लेखोर पसार झाले. नववधूच्या एक्स बॉयफ्रेण्डनेच हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप आहे. हरियाणातील रोहतकमध्ये हा प्रकार घडला. गंभीर जखमी नववधूला रोहतकच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती नाजूक असल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपासाला सुरुवात केली.

काय आहे प्रकरण?

नववधू सांपला गावातील रहिवासी आहे. तिचे लग्न आनंदपूर गावातील तरुणासोबत अत्यंत थाटामाटात झालं. शुक्रवारी पाठवणीनंतर नववधू सासरी जायला निघाली होती. नवरदेवाचा भाऊ सुनील कार चालवत होता. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास त्यांची गाडी शिव मंदिराजवळ पोहोचली. तेव्हा मागून आलेल्या एका इनोव्हा कारने त्यांना ओव्हरटेक करुन गाडी थांबवली. आत बसलेले तिघे जण खाली उतरले. त्यांनी नववधूला गोळी मारली. ती रक्तबंबाळ होऊन गाडीतच कोसळली. त्यानंतर हल्लेखोर सुनीलची सोन्याची चेन लुटून पसार झाले. नववधूला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नववधूच्या एक्स बॉयफ्रेण्डवर संशय

नववधूचा एक्स बॉयफ्रेण्ड आणि त्याच्या साथीदारांनी हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे. आरोपी सांपला गावापासून नववधूच्या कारचा पाठलाग करत असल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यानंतर हवेत गोळीबार करुन ते पसार झाले. या घटनेनंतर गावात दहशतीचं वातावरण पसरलं आहे.

या घटनेमुळे नववधूच्या कुटुंबीयांची रडून-रडून बिकट अवस्था झाली आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक केली जाईल, असं पोलिसांचं म्हणणं आहे. गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा कारही चोरीची असल्याचं समोर आलं आहे. सांपला गावातील वीटभट्टी मालकाकडून पिस्तुलाच्या धाकाने गाडी चोरल्याचं पोलीस तपासात उघड झालं.


संबंधित बातम्या :

अल्पवयीन मुलीस गर्भपातास भाग पडणाऱ्या प्रियकरासह डॉक्टराला अटक

सकाळी तरुणीसोबत हॉटेल रुम बूक, चार तासात असं काय घडलं, की तरुणाने तिचा गळा चिरला?

नऊ वर्षांच्या चिमुरड्याची निर्घृण हत्या, सीसीटीव्ही फूटेजने बिंग फोडलं

Published On - 11:38 am, Thu, 2 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI