Pune Crime | धक्कादायक ! अल्पवयीन मुलीस गर्भपातास भाग पडणाऱ्या प्रियकरासह डॉक्टराला अटक

पीडित मुलीचे व आरोपीचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. पीडितेच्या प्रियकर आरोपी अमित याने शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केले होते. त्यामुळे तिला गर्भपात करावा लागला होता.

Pune Crime | धक्कादायक ! अल्पवयीन मुलीस गर्भपातास भाग पडणाऱ्या प्रियकरासह डॉक्टराला अटक
प्रातिनिधिक फोटो

पुणे – शहरात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. शहरातील वडगाव शेरी परिसरात नुकतीच १६ वर्षीय मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवून गर्भपात केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेतील प्रियकर व साथीदारासह गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे.

अशी घडली घटना  याबाबत मिळालेली माहिती अशी की पीडित मुलीचे व आरोपीचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. पीडितेच्या प्रियकर आरोपी अमित याने शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केले होते. त्यामुळे तिला गर्भपात करावा लागला होता. दरम्यान आरोपी प्रियकराचा मित्र असलेल्या धनंजय रोकडे यानेही पिडीतेसोबत जबरदस्तीने युवतीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. इतकच नव्हे तर याचा व्हिडीओ प्रियकराने त्याच्या मोबाईलमध्ये तयार करून , सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यानंतर मुलीने पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार दाखल केली.

पोलिसांनी केली कारवाई 

पीडितेच्या तक्रारीवरून येरवडा पोलिसांनी आरोपी प्रियकर अमित अबदेश यादव (वय 18 रा. निरामय हॉस्पिटल जवळ, वडगावशेरी) व त्याचा साथीदार धनंजय नामदेव रोकडे (वय 38 ,रा. वडगावशेरी गावठाण) यांच्यासह गर्भपात करणारे डॉक्टर अनिल बाळकृष्ण वरपे (वय 59, रा. वडगाव शेरी पुणे) यांना अटक केली आहे. वडगावशेरी येथील एका सोसायटीच्या शेजारील अर्धवट बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये हा गंभीर गुन्हा घडला. याप्रकरणी दोन आरोपींना सहा दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान याच गुन्ह्यातील गर्भपात करणारे डॉक्टर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांनाही पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या गुन्ह्याचा तपास गुन्हे निरीक्षक विजयसिंह चौहान करीत आहेत.

नऊ वर्षांच्या चिमुरड्याची निर्घृण हत्या, सीसीटीव्ही फूटेजने बिंग फोडलं

Video | रस्त्याच्या कडेला टोळकं दबा धरुन बसलं, गाडीतून उतरताच लाठ्याकाठ्यांनी महिलेला बदडलं, पोलिसात तक्रार

अवकाळीनंतर ‘असे’ करा फळबागांचे व्यवस्थापन, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?

Published On - 11:14 am, Thu, 2 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI