
Crime News : एका महिलेची फसवणूक करून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर पीडित महिलेने पोलीस ठाणे गाठल्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील ग्वालियर येथे ही घटना घडली आहे. ही महिला भिंड या भागात राहणारी असून तिला शिवपुरी येथे जायचे होते. बसमध्ये बसलेली असताना बसचा वाहक विष्णू ओझा याने महिलेची फसवणूक करून तिला बसमध्येच बसवून ठेवले आणि बस यार्डमध्ये तिच्यावर बलात्कार केला.
महिलेसोबत ही घटना घडल्यानंतर तिने घाबरत घाबरत पोलीस ठाणे गाठले. घडलेला प्रकार समजताच पोलिसांनी तक्रार दाखल करत बसच्या वाहकाला ताब्यात घेतले आहे. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी महिलेच्या वैद्यकीय चाचण्या केल्या आहेत. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. हा प्रकार समोर आल्यानंतर आता बसमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला सोमवारी (27 ऑक्टोबर) ग्वालियर बसस्थानकावर पोहोचली होती. तिला शिवपुरी येथे जायचे होते. या महिलेला एक दोन वर्षांचा मुलगा आहे. तिचे पतीसोबत भांडण असून तिच्या चरितार्थासंदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. कौटुंबिक पातळीवर आयुष्यात हे वादळ असताना ती ग्वालियर बस स्थानकाहून शिवपुरी येथे जाण्यासाठी एका बसमध्ये बसली होती. या बसमध्ये तिची बसचा चालक विष्णू ओझा याच्याशी भेट झाली. मी गुना येथील रहिवासी असल्याचे या चालकने महिलेला सांगितले.
दोघांमध्ये काही संवाद झाल्यानंतर महिलेने रात्री शिवपुरीहून परत ग्वालियरला यायचे असल्याचे सांगितले. त्यामुळे चालकाने मी तुम्हाला रात्री भिंड येथे सोडून देतो, असे आश्वासन आश्वासन दिले. विष्णू ओझा याने रात्री पीडित महिलेला कॉल केला आणि तुम्हाला ग्वालियर येथे सोडतो असे सांगत बस स्थानकावर बोलवून घेतले. महिलेचे शिवपुरी येथील काम संपले होते. त्यामुळे चालकाने सांगितल्यानुसार पीडित महिला शिवपुरी बसस्थानकावर पोहोचली.
ठरल्यानुसार बस ग्वालियर येथे आली. पुढे ही बस बसयार्डमध्ये लावण्यात आली. मी तुम्हाला भिंड येथे सोडून देते असे सांगून तुम्ही बसमध्येच थांबा असे विष्णूने पीडित महिलेला सांगितले. सर्व प्रवासी उतरल्यानंतर मात्र बसचा दरवाजा बंद करून आरोपीने पीडित महिलेवर जबरदस्ती केली. बलात्काराच्या घटनेनंतर पीडित महिलेने थेट पोलीस ठाणे गाठले. सध्या पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलीस यासंदर्भात पुढील तपास करत आहेत.