पिकअप गाडी तीव्र उतारावरुन मागे दरीत कोसळली, दोन चिमुरड्यांसह महिलेचा मृत्यू

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील मोदलगाव येथे हा अपघात झाला. मजुरांना घेऊन जात असलेल्या पिक अप गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे

पिकअप गाडी तीव्र उतारावरुन मागे दरीत कोसळली, दोन चिमुरड्यांसह महिलेचा मृत्यू
नंदुरबारमध्ये पिक अप गाडीचा अपघात
| Edited By: | Updated on: Jan 06, 2022 | 3:17 PM

नंदुरबार : नियंत्रण सुटल्यामुळे पिक अप गाडी तीव्र उतारावरुन मागे दरीत कोसळून भीषण अपघात झाला. यामध्ये तिघा जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी आहेत. नंदुरबारमध्ये ही अपघाताची थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. मृतांमध्ये एका महिलेचा आणि दोन लहान बालकांचा समावेश आहे.

नेमकं काय घडलं?

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील मोदलगाव येथे हा अपघात झाला. मजुरांना घेऊन जात असलेल्या पिक अप गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. पिक अप गाडी तीव्र उतारावरुन मागे येत लगतच्या दरीत गेल्याने भीषण अपघात झाला.

अपघाताच्या वेळी गाडीत 25 हून अधिक मजूर

अपघातात तिघा जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी आहेत. मृतांमध्ये एका महिलेचा आणि दोन बालकांचा समावेश आहे. जखमींना धडगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सर्व मजूर हे गोरांबा येथील रहिवाशी आहेत. अपघाताच्या वेळी गाडीत 25 हून अधिक मजूर असल्याची माहिती आहे. मजुरीसाठी सर्व जण नंदुरबारकडे जात होते.

संबंधित बातम्या :

दीड महिन्यांच्या बाळाला पाहायला नगरसेविकेची मुलं निघाली, पहाटे दोघे भाऊ मृतावस्थेत

अय्यो … पतीने पत्नीला भर रस्त्यात उचलून आपटले ; संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

VIDEO | टाकी फुल केली, मग सुसाट पळाला; पेट्रोल पंपावर पैसे बुडवून ड्रायव्हरची धूम