Aurangabad CCTV | हळदीच्या कार्यक्रमात 36 लाखांच्या दागिन्यांवर डल्ला, हायप्रोफाईल चोरटे मोकाट

हाय प्रोफाईल चोरट्यांनी 36 लाख रुपयांच्या दागिन्यांची बॅग पळवली. औरंगाबाद शहरातील सुर्या लॉन्समध्ये ही खळबळजनक घटना घडली. 36 लाख रुपयांच्या दागिन्यांची बॅग पळवणारा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Aurangabad CCTV | हळदीच्या कार्यक्रमात 36 लाखांच्या दागिन्यांवर डल्ला, हायप्रोफाईल चोरटे मोकाट
औरंगाबादेत हळदीच्या कार्यक्रमात चोरी
| Edited By: | Updated on: Dec 08, 2021 | 9:59 AM

औरंगाबाद : हळदीच्या कार्यक्रमात चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. चक्क 36 लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दागिन्यांची बॅग पळवणारा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. औरंगाबादमध्ये ही घटना घडली.

काय आहे प्रकरण?

हाय प्रोफाईल चोरट्यांनी 36 लाख रुपयांच्या दागिन्यांची बॅग पळवली. औरंगाबाद शहरातील सुर्या लॉन्समध्ये ही खळबळजनक घटना घडली. 36 लाख रुपयांच्या दागिन्यांची बॅग पळवणारा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

हाय प्रोफाईल चोरट्याचा धुमाकूळ

लग्न समारंभातून दागिन्यांची बॅग पळवण्याची औरंगाबाद शहरातील ही तिसरी घटना असल्याची माहिती आहे. हाय प्रोफाईल चोरटे सफाईदारपणे दागिने पळवून फरार होत असल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. लग्नसराईचा मौसम असल्याने अनेक लग्नघरांची डोकेदुखी वाढली आहे.

36 लाखांचे दागिने चोरी प्रकरणी चिखलठाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे चोरट्याला जेरबंद करण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

VIDEO | मुंबई-अहमदाबाद हायवेवर गाडी पेटली, प्रवासी बालंबाल बचावले, कार जळून खाक

Bribe | दहा लाखांची मागणी, सात लाखात तडजोड, लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षकावर गुन्हा

 स्पा सेंटरच्या नावाखाली हाय प्रोफाइल कुंटणखाना, औरंगाबादेत पोलिसांचा छापा, आंटीसह एजंटला अटक