Bribe | दहा लाखांची मागणी, सात लाखात तडजोड, लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षकावर गुन्हा

यवतमाळ जिल्ह्यातील लोहारा पोलीस ठाण्यातील 52 वर्षीय सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल घुगल यांना अटक करण्यात आली आहे. घुगलशिवाय विद्युत वसानी आणि विशाल माकडे (रा. यवतमाळ) या खासगी व्यक्तींवरही कारवाई करण्यात आली आहे.

Bribe | दहा लाखांची मागणी, सात लाखात तडजोड, लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षकावर गुन्हा
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 08, 2021 | 7:22 AM

यवतमाळ : यवतमाळमधील लोहारा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकावर लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला जामीन देण्यासाठी त्याने तब्बल 10 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. सात लाखात तडजोड झाल्याबाबत तक्रार प्राप्त झाल्यावर शहानिशा करुन एसीबी यवतमाळने गुन्हा दाखल केला.

पोलिसानेच मागितल्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील लोहारा पोलीस ठाण्यातील 52 वर्षीय सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल घुगल यांना अटक करण्यात आली आहे. घुगलशिवाय विद्युत वसानी आणि विशाल माकडे (रा. यवतमाळ) या खासगी व्यक्तींवरही कारवाई करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

तक्रारदाराच्या विरुद्ध यवतमाळमधील लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये जामीन होण्यास मदत होईल, यासाठी आरोपींनी 10 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार 6 डिसेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली होती.

लाच स्वीकारताना रंगेहाथ

या तक्रारीची 6 तारखेला पंचांसमक्ष पडताळणी केली असता, आरोपींनी 7 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करुन स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार 7 डिसेंबर रोजी एका मोबाईल शॉपमध्ये सापळा रचून कारवाई करताना घुगल यांनी लाचेची रक्कम विशाल माकडेच्या मार्फत स्वीकारली, तसेच विद्युत वसानी यांनी लाच स्वीकारण्यास प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे. त्यावरुन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या विरुद्ध यवतमाळ शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली.

संबंधित बातम्या :

स्पा सेंटरच्या नावाखाली हाय प्रोफाइल कुंटणखाना, औरंगाबादेत पोलिसांचा छापा, आंटीसह एजंटला अटक

पुण्यात लॉजमध्ये देहव्यापार, मॅनेजरला बेड्या; दहा महिलांना केलं मुक्त

हात-पाय बांधून लेकाला विहिरीत फेकलं, दुसऱ्या बायकोच्या मदतीने बापानेच काढला काटा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.