वाईन शॉपीवर दारु खरेदी करताना चाकूहल्ला, औरंगाबादमध्ये तरुणाचा मृत्यू

| Updated on: Oct 11, 2021 | 7:45 AM

सिद्धार्थ रंगनाथ हिवराळे असं हत्या झालेल्या 35 वर्षीय हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. दारु विकत घेत असताना एकाने येऊन त्याच्या पोटात जोराने चाकू मारला आणि आरोपी पळून गेला

वाईन शॉपीवर दारु खरेदी करताना चाकूहल्ला, औरंगाबादमध्ये तरुणाचा मृत्यू
खेडमधील हत्येचे गूढ उकलले; सोन्याच्या दागिन्यांसाठी केली वृद्धाची हत्या
Follow us on

औरंगाबाद : वाईन शॉपीवर दारु खरेदी करण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. औरंगाबादच्या सिडको एन-8 परिसरातील विश्वास वाईन शॉपी समोर हा प्रकार घडला.

दारु विकत घेताना चाकूहल्ला

सिद्धार्थ रंगनाथ हिवराळे असं हत्या झालेल्या 35 वर्षीय हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. दारु विकत घेत असताना एकाने येऊन त्याच्या पोटात जोराने चाकू मारला आणि आरोपी पळून गेला असल्याची माहिती सिडको पोलिसांनी दिली.

जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी अवस्थेत त्या व्यक्तीला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून घाटी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घटनास्थळी डीसीपी दीपक दीपक गीऱ्हे, एसीपी निशिकांत भुजबळ, पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी भेट दिली. आरोपीच्या शोध गुन्हे शाखा आणि इतर डीबी पथक घेत आहेत.

उत्तर प्रदेशात साधूची हत्या

दुसरीकडे, उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील मंदिराच्या छतावर झोपलेल्या साधूची कुऱ्हाडीने वार करुन निर्घृण हत्या करण्यात आली. मंदिरात साधूची हत्या झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. साधूच्या मान आणि चेहऱ्यावर कुऱ्हाडीने वार केल्याचं वृत्त आहे. पोलिसांनी साधूचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

काय आहे प्रकरण?

ही संपूर्ण घटना उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील कोतवाली ग्रामीण भागातील नागला जगरुप गावाची आहे. गढी तालुक्यातील रहिवासी असलेले 52 वर्षीय साधू किरपाल सिंह हे एका महिन्यापूर्वीच मंदिरात राहायला आले होते. काल रात्री आरोपी तरुण त्यांच्याकडे आला आणि त्याने त्यांच्यासोबत जेवण केले.

कुऱ्हाडीने वार करुन निर्घृण हत्या

आरोपीने साधू किरपाल सिंह यांची कुऱ्हाडीने वार करुन निर्घृण हत्या केली आणि घटनास्थळावरून पळून गेल्याचा आरोप आहे. गावातील लोक सकाळी मंदिरात प्रार्थना करण्यासाठी गेले असता साधूचा मृतदेह मंदिराच्या आवारात पडलेला आढळला.

आरोपीकडून हत्येची कबुली

साधूच्या हत्येची बातमी मिळतातच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. वरिष्ठ पोलीस अधीक्षक उदय शंकर सिंह हे मोठ्या पोलीस बंदोबस्तासह घटनास्थळी आले. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या आरोपीने साधूची हत्या केल्याची कबुली दिली आहे.

वीस वर्षांपासून संधीची प्रतीक्षा

20 वर्षांपूर्वी साधू किरपाल सिंह यांनी आपल्या वडिलांचा खून केला होता, ज्याचा बदला घेण्यासाठी मी गेल्या 20 वर्षांपासून वाट पाहत होतो, असा दावा आरोपीने केला आहे. जेव्हा मला एका साधूच्या वेशात मंदिरात राहणाऱ्या किरपालबद्दल कळले तेव्हा त्याच्याशी मैत्री करुन संधी मिळताच मी त्याचा खून केला, असा दावाही त्याने केला.

संबंधित बातम्या :

उल्हासनगरात वालधुनी नदीत अज्ञात मृतदेह, परिसरात खळबळ, हत्या की आत्महत्या, गूढ कसं उलगडणार?

मुलाच्या काळजीमुळे अचानक यूटर्न, दोघांचा बळी घेणाऱ्या अपघातानंतर कार चालकाचा दावा

लग्नाच्या आमिषाने विवाहित पोलीस उपनिरीक्षकाकडून बलात्कार, कोथरुड पोलिसात तक्रार