VIDEO | औरंगाबादच्या उच्चभ्रू वस्तीत 16-17 गाड्यांची तोडफोड, मध्यरात्री हुल्लडबाजांचा धुमाकूळ

| Updated on: Aug 27, 2021 | 11:33 AM

औरंगाबाद शहरातील उच्चभ्रू वेदांत नगर परिसरामध्ये रस्त्यावर लावलेल्या गाड्यांची रात्री साडेबारा ते एक वाजताच्या सुमारास आलेल्या चोरट्यांनी तोडफोड केली आहे. या तोडफोडीमध्ये अनेक गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.

VIDEO | औरंगाबादच्या उच्चभ्रू वस्तीत 16-17 गाड्यांची तोडफोड, मध्यरात्री हुल्लडबाजांचा धुमाकूळ
औरंगाबादेत गाड्यांची तोडफोड
Follow us on

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील वेदांत नगर परिसरामध्ये अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास सोळा ते सतरा गाड्यांची तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. चोरीच्या उद्देशाने ही तोडफोड करण्यात आली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

काय आहे प्रकरण?

रस्त्यावर लावलेल्या गाड्यांची रात्री साडेबारा ते एक वाजताच्या सुमारास आलेल्या चोरट्यांनी तोडफोड केली आहे. या तोडफोडीमध्ये अनेक गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. वाहन चालकांनी आपल्या गाड्यांमधून दोन ते तीन लॅपटॉप चोरीला गेल्याची तक्रार सुद्धा नोंदवलेली आहे.

वेदांत नगर परिसर हा उच्चभ्रू लोकांची वस्ती मानली जाते. मात्र ही तोडफोड नक्की कोणी केली आणि का केली याचा शोध पोलिस घेत आहेत. आरोपींना पकडण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.

पाहा व्हिडीओ :

औरंगाबादेत कार तोडफोड प्रकरणाची पुनरावृत्ती

दरम्यान, दहशत निर्माण करण्याच्या हेतूने एका टोळक्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षा-कारच्या काचा फोडल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वीच औरंगाबादमध्ये उघडकीस आला होता. गेल्याच रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास औरंगाबादमधील किराडपुरा भागात हा प्रकार घडला होता.

वैयक्तिक वादातून झालेली तोडफोड

रेहाणा सांडू खान यांचा नारेगाव येथील आरोपी शेख इस्माईल शेख इब्राहिम, शेख उमर शेख इब्राहिम, शेख फारुख शेख इब्राहिम आणि मोबीन यांच्याशी वैयक्तिक वाद होता. हा वाद अधिकच चिघळला आणि त्यानंतर आरोपींनी किराडपुरा भागात येऊन दहशत निर्माण करण्याच्या हेतूने परिसरात उभी असलेली वाहने फोडत पळ काढला होता.

या घटनेची माहिती कळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. परिसरात काही काळ निर्माण झालेला तणाव पोलिसांनी शांत केला होता. वैयक्तिक वादातून हा प्रकार घडल्याची माहिती देत पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

संबंधित बातम्या :

वैयक्तिक वादातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न, औरंगाबादेत रस्त्यावर गाड्यांची तोडफोड