Jalgaon | भरलेल्या रिक्षातून तोल जाऊन रस्त्यात पडली, अकरावीच्या विद्यार्थिनीचा करुण अंत

अनेक खासगी वाहतूकदार क्षमतेपेक्षा जास्त किंवा फ्रंट सीट बसवून वाहने चालवतात. याच पद्धतीने प्रवास करणे शेलवड येथील तृप्तीच्या चौधरीच्या जीवावर बेतले.

Jalgaon | भरलेल्या रिक्षातून तोल जाऊन रस्त्यात पडली, अकरावीच्या विद्यार्थिनीचा करुण अंत
वॉशरूममध्ये मोबाईल लपवून शिक्षिकेचे केले चित्रीकरणImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 10:07 AM

जळगाव : कॉलेज सुटल्यावर घरी जाताना रिक्षातून (Rickshaw Accident) पडल्याने विद्यार्थिनीला प्राण गमवावे (Student Death) लागले. तृप्ती भगवान चौधरी असं दुर्घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. इयत्ता अकरावीत शिक्षण घेणारी 17 वर्षीय तृप्ती तोल गेल्याने रिक्षातून खाली पडली होती. जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon) बोदवड तालुक्यात ही घटना घडली. तृप्ती चौधरीला अपघातात गंभीर इजा झाली होती. अपघातानंतर जखमी अवस्थेत जळगावला नेत असताना तिचा रस्त्यात मृत्यू झाला. या घटनेमुळे जळगावात हळहळ व्यक्त केली जात आहे. तृप्तीच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

एसटी संपामुळे विद्यार्थ्यांची दुर्दशा

एसटीचा संप सुरू नसताना बोदवड तालुक्यातील वेगवेगळ्या खेडेगावातील तब्बल 4 हजार 215 विद्यार्थी पासेस काढून शिक्षणासाठी अप-डाऊन करायचे. त्यात इयत्ता पाचवी ते दहावीच्या मुलींसाठी असलेल्या अहिल्याबाई होळकर योजनेतून 1 हजार 365, दहावी आणि बारावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या 850 विद्यार्थिनी मानव विकास या बसमधून प्रवास करायच्या. याशिवाय 2 हजार विद्यार्थी मिळून एकूण 4 हजार 295 विद्यार्थी एसटी बसने नियमित प्रवास करत होते.

तर तृप्ती चौधरी वाचली असती…

विद्यार्थ्यांसाठी एसटी दिवसभरातून 21 फेऱ्या करायची. मात्र, कोरोनानंतर शाळा-महाविद्यालये सुरू होताच 8 नोव्हेंबरला एसटीचा संप सुरू झाला. परिणामी सर्व विद्यार्थ्यांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. अनेक खासगी वाहतूकदार क्षमतेपेक्षा जास्त किंवा फ्रंट सीट बसवून वाहने चालवतात. याच पद्धतीने प्रवास करणे शेलवड येथील तृप्तीच्या चौधरीच्या जीवावर बेतले. कदाचित एसटीचा संप सुरू नसता तर ही दुर्घटना घडली नसती.

संबंधित बातम्या :

Virar Accident | भरधाव रिक्षा उलटली, पहाटे चार वाजता अपघाताचा थरार, 15 वर्षांचा मुलगा ठार

एका बाजूनं बस आली, तिच्यापुढं बाईक सुसाट, मधात थेट पोराची सायकल घुसली, दैवावर विश्वास ठेवायला लावणारी घटना कॅमेऱ्यात कैद

CCTV | तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडला, Nashik मध्ये तीन वर्षांचा चिमुरडा आश्चर्यकारकरित्या बचावला

Non Stop LIVE Update
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.