पोलिसांच्या हाताला झटका, जळगाव जिल्हा कारागृहाच्या आवारातून कैदी फरार

| Updated on: May 20, 2022 | 10:49 AM

जळगाव जिल्हा कारागृहात नेत असतांना पोलीसांच्या हाताला झटका देवून वाशीम जिल्ह्यातील कैदी फरार झाल्याची धक्कादायक घटना घडली.

पोलिसांच्या हाताला झटका, जळगाव जिल्हा कारागृहाच्या आवारातून कैदी फरार
जेल
Image Credit source: tv9
Follow us on

जळगाव : जिल्हा कारागृहाच्या आवारात पोलीसांच्या हाताला झटका देवून कैदी फरार (Prisoner Fled away) झाला. जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव जिल्हा कारागृहात (Jalgaon District Jail) नेत असतांना पोलीसांच्या हाताला झटका देवून वाशीम जिल्ह्यातील कैदी फरार झाल्याची धक्कादायक घटना (Jalgaon Crime News) घडली. या प्रकरणी फरार कैद्याविरोधात जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

जळगाव  जिल्हा कारागृहाच्या आवारात पोलीसांच्या हाताला झटका देवून कैदी फरार झाला. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव जिल्हा कारागृहात नेत असतांना पोलीसांच्या हाताला झटका देवून वाशीम जिल्ह्यातील कैदी फरार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी फरार कैद्याविरोधात जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटकेत असलेला कैदी महेश शिवदास दीक्षे (वय-30) रा. लोणी बुद्रुक ता. रिसोड जि. वाशिम याला अटक करण्यात आले होते. पुढील कारवाईसाठी कैद्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर  भुसावळ येथून जळगाव येथील जिल्हा कारागृहात ट्रान्स्फर होण्यासाठी भुसावळ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक व पो.कॉ. ईश्वर संजय भालेराव शासकीय वाहनाने जिल्हा कारागृहात आणण्यात आले होते.

हे सुद्धा वाचा

कैदी महेश दिक्षे प्रभारी जेल अधीक्षक यांना कागदपत्र दाखवत असताना कैदी महेश दीक्षे याने  पोलीस नाईक अमित तडवी यांच्या हाताला झटका देऊन सबजेल पोलीस लाईनच्या गल्लीतून पळून जाण्यात यशस्वी झाला. भुसावळ पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता तो मिळून आला नाही. अखेर भुसावळ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक पोलीस नाईक अमित तडवी यांनी सायंकाळी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून कैदी महेश शिवदास दीक्षे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे