AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

72 तास धोक्याचे, मुसळधार पाऊस, भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा, थेट…

Maharashtra Weather Update : राज्यासह देशात मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी कडाक्याची थंडी. सध्या देशातील अनेक शहरांमध्ये वायू प्रदूषण हा मोठा मुद्दा बनलाय.

72 तास धोक्याचे, मुसळधार पाऊस, भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा, थेट...
Weather Update
| Updated on: Dec 20, 2025 | 9:08 AM
Share

राज्यातील किमान तापमानात घट झाल्याने तुरळक ठिकाणी थंडीची लाट आहे. उर्वरित राज्यात देखील थंडी वाढल्याचे दिसून येतेय. राज्यातील किमान तापमानात हळूहळू वाढ होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. तरीही थंडी कायम राहणार असल्याची शक्यता देखील वर्तवली आहे. उत्तर भारतात थंडी वाढत आहे. त्यामुळे राज्यात शीत लहरी वाढल्या आहेत. वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. यासोबतच वायू प्रदूषण प्रचंड वाढले असून नागरिकांच्या आरोग्याच्या समस्याही निर्माण झाल्या आहेत. देशात काही ठिकाणी कडाक्याची थंडी बघायला मिळत आहे तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि केरळमधील काही भागात सध्या पाऊस आहे.

नाशिकच्या निफाड तालुक्याचा किमान तापमानाचा पारा घसरला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे निफाड तालुका गारठला. तालुक्यातील रुई येथे 4.07 अंश सेल्सिअस तर कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात 4.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. या वाढत्या थंडीमुळे लासलगाव येथील शिवनदीवर बाष्पयुक्त धूके पडले. पाण्यावरील बाष्पयुक्त धुक्यामुळे परिसरात नयनरम्य दृश्य. थंडीचा शेती पिकांवर ही परिणाम होत आहे. द्राक्षासाठी अपायकारक तर गहू हरवण्यासाठी पोषक थंडी.

धुळे येथे 5.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोद झाली. परभणी 6 अंश सेल्सिअस तापमान होते. गोदिंया, नाशिक, मालेगाव, जळगाव पुणे, नागपूर येथे 9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. बीड, परभणी, धुळे, निफाड येथे पुढील काही दिवसांमध्ये थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. मुंबईमध्येही सकाळच्या वेळी थंडी जाणवत आहे. दुपारी उन्हाचा कडाका बघायला मिळतोय.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 72 तासांत अनेक भागांमध्ये हलका ते जोरदार पाऊस पडू शकतो. तर काही ठिकाणी पावसासोबत हिमवृष्टी होण्याचीही शक्यता आहे. 21 डिसेंबर रोजी जम्मू आणि काश्मीर, मुझफ्फराबाद, लडाख येथे मुसळधार पाऊस होऊ शकतो. 22 डिसेंबर दरम्यान पंजाबच्या काही भागांमध्येही पाऊस पडू शकतो. हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी अनेक राज्यांमध्ये दाट धुक्याचा इशारा दिला आहे. पंजाब, उत्तराखंड आणि बिहारमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.