जीवे मारण्याची धमकी, जालन्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, एकाला अटक

जालना जिल्ह्यातील बदनापुर तालुक्यातील कंडारी खुर्द येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. मुलगी एकटी असल्याचे पाहून दोघांनी निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे

जीवे मारण्याची धमकी, जालन्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, एकाला अटक
जालन्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार
| Edited By: | Updated on: Aug 14, 2021 | 2:43 PM

जालना : अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना जालन्यात उघडकीस आली आहे. मुलगी एकटी असल्याचं पाहून आरोपींनी निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दुसऱ्याचा शोध सुरु आहे.

नेमकं काय घडलं?

जालना जिल्ह्यातील बदनापुर तालुक्यातील कंडारी खुर्द येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. मुलगी एकटी असल्याचे लक्षात येताच आरोपी सोपान ढाकणे आणि शंभु ढाकणे या दोघांनी मुलीला निर्जन स्थळी नेले. तिथे तिला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर या घटनेबद्दल कुणाला सांगू नको, म्हणून पुन्हा धमकी दिल्याचा आरोप आहे.

एकाला अटक, दुसरा पसार

या घटनेनंतर काही नागरिकांना मुलगी बेशुद्ध अवस्थेत सापडली. त्यानंतर याविषयी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी जखमी मुलीस उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, बलात्कार करणाऱ्यांपैकी आरोपी सोपान ढाकणे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत, तर दुसरा आरोपी शंभु ढाकणे हा फरार आहे. या प्रकरणी आरोपींवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गतिमंद तरुणीवर चौघांचा गँगरेप

महाराष्ट्राच्या उपराजधानीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना नुकतीच समोर आली होती. काही नराधमांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत आणि तरुणी गतिमंद असल्याचं हेरत तिला मोमीनपुरा भागातील टिमकी परिसरात एका खोलीत नेलं. त्या ठिकाणी चार जणांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार करुन त्यानंतर तिला ऑटोने मेयो रुग्णालय परिसरातील मेट्रो ब्रिजजवळ सोडलं. आरोपी त्यानंतर पळून गेले. त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या इतर दोन संशयितांनी तिच्यावर ऑटो रिक्षामध्ये अत्याचार केला आणि ते पण पळून गेले.

पीडित मुलगी त्याच ठिकाणी पडून असल्याचं बघून जवळच असलेल्या रेल्वे पोलिसांना याची माहिती काही नागरिकांनी दिली. रेल्वे पोलिसांनी तिला विचारपूस करत चाइल्डला दिली त्यांनी मुलीला आपल्या सोबत घेऊन गेले आणि विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने माहिती दिली. चाइल्ड लाईनने रेल्वे पोलिसांना याची माहिती दिली आणि त्यांनी चार आरोपींचा शोध घेत ताब्यात घेतलं.

संबंधित बातम्या :

उपराजधानी हादरली, नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

दारुड्या काकाचा सात वर्षांच्या पुतणीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, स्थानिकांकडून चोप