नांदेडमध्ये बापाकडून पोटच्या मुलीची तीन वेळा विक्री, पोलिसात तक्रारीनंतर तरुणीची सुटका

नांदेडच्या कुटुंबाने मुलीची तीन वेळा विक्री केल्याचं समोर आलं आहे. आधी मुलीला राजस्थानमध्ये दलालांच्या मार्फत विकले होते. परत याच मुलीची औरंगाबादमधून दोन वेळा विक्री झाली होती.

नांदेडमध्ये बापाकडून पोटच्या मुलीची तीन वेळा विक्री, पोलिसात तक्रारीनंतर तरुणीची सुटका
Follow us
| Updated on: Sep 03, 2021 | 1:16 PM

नांदेड : नांदेडमध्ये बापाने पोटच्या मुलीची तीन वेळा विक्री केल्याची घटना उघडकीस आली आहे. हदगाव तालुक्यातील ही घटना असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. वडील, सावत्र आई आणि सावत्र भावंडांनी मिळून मुलीची विक्री केल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण?

नांदेडच्या कुटुंबाने मुलीची तीन वेळा विक्री केल्याचं समोर आलं आहे. आधी मुलीला राजस्थानमध्ये दलालांच्या मार्फत विकले होते. परत याच मुलीची औरंगाबादमधून दोन वेळा विक्री झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आता मुलीची सुटका केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वडील, सावत्र आई आणि सावत्र भावंडांनी मिळून मुलीची विक्री केल्याचा आरोप आहे.

पाहा व्हिडीओ :

औरंगाबादेत उधारीचे एक लाख चुकवण्यासाठी चिमुकल्यांना भीकेला लावलं

दुसरीकडे, एक लाख रुपये परत मिळवण्यासाठी अकोल्याहून दोन महिलांनी दोन चिमुकल्यांना शहरात आणून भीक मागायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी जनाबाई (वय 65 वर्ष) आणि सविता (वय 35 वर्ष) (दोघी रा. मुकुंदवाडी) यांना अटक केली आहे. अटकेत असलेल्या दोन्ही महिला सात महिन्यांपूर्वी अकोला जिल्ह्यातील राहुल पगारे आणि शेख पाशा यांच्याकडून या मुलांना आणल्याचे पोलिसांना सांगत आहेत.

नेमकं काय घडलं?

मुकुंदवाडी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते शिवराज नाथाजी वीर (वय 47) यांनी दोन दिवसांपासून या महिला दोन्ही मुलांना मारहाण करत असल्याचे पाहिले होते. या प्रकरणी वीर यांनी महिलांना हटकल्यानंतर त्यांनी या मुलांच्या पालकांकडून प्रत्येकी 50 हजार रुपये येणे बाकी आहेत, म्हणून त्यांची मुलं आणली असल्याचे सांगितले. तसेच तसा बॉण्ड केल्याचाही दावा केला.

उधारीऐवजी मुलांना सोपवलं

शिवराज वीर यांनी या घटनेची माहिती मुकुंदवाडी पोलिसांना दिल्यावर पोलिस निरीक्षक मनोज पगारे, उपनिरीक्षक भराटे यांच्या पथकाने दोन्ही महिलांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पालकांना जास्तीची मुले असल्यामुळे त्यांनी उधारी देण्याऐवजी मुलांना आमच्या हवाली केले असल्याचे सांगितले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक भराटे करत आहेत.

चेन्नईत आईच्या परवानगीने दुकानदाराचा मुलीवर बलात्कार

दरम्यान, कर्नाटकच्या म्हैसुरुमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्काराचा प्रकार ताजा असताना, तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तिशीच्या आत वय असलेल्या दोघी बहिणींनी एका दुकानदाराला आपल्याच अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण्याची परवानगी दिली आणि त्याचे व्हिडिओही रेकॉर्ड करु दिले. दुकानातून खरेदी केलेल्या सामानाच्या मोबदल्यात त्यांनी ही घृणास्पद डील केल्याचा आरोप आहे. दुकानदाराने बहिणींच्या अल्पवयीन मुलींच्या तीन मैत्रिणींवरही बलात्कार करुन त्याचे चित्रीकरण केल्याचा दावा केला जात आहे.

तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रेत्यांचा तपशील मिळवण्यासाठी जप्त केलेला दुकानदाराचा मोबाईल फोन तपासल्यावर पोलिसांना धक्काच बसला. मोबाईलच्या फोटो गॅलरीमध्ये त्यांना एका पुरुषाने लहान मुलांवर केलेल्या लैंगिक अत्याचाराचे सुमारे 50 व्हिडिओ आढळले. पोलिसांना सुरुवातीला वाटले की दुकानदाराने चाईल्ड पॉर्न डाऊनलोड केले आहे. मात्र व्हिडीओ क्लिपमध्ये दिसणारी व्यक्ती ही खुद्द दुकानदार पेरुमल असल्याचं सिद्ध झालं. त्यानंतर पेरुमलला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं. टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार चौकशी दरम्यान त्याने पोलिसांना सांगितले, की तो पाच अल्पवयीन मुलांवर गेल्या सहा महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करत होता.

संबंधित बातम्या :

एक लाखांची उधारी झेपेना, पालकांनी पोटची पोरं पाठवली, दोघींनी औरंगाबादेत चिमुकल्यांना भीक मागायला बसवलं

खरेदी झाली, पैसे नव्हते, तिशीतील बहिणींच्या परवानगीने दुकानदाराचा अल्पवयीन मुलींवर बलात्कार

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.