खरेदी झाली, पैसे नव्हते, तिशीतील बहिणींच्या परवानगीने दुकानदाराचा अल्पवयीन मुलींवर बलात्कार

पेरुमल नावाच्या 48 वर्षीय दुकानदाराने प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ साठवल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या दुकानावर छापा टाकला असता ही बाब उघडकीस आली. छाप्यादरम्यान, तंबाखूच्या पदार्थांची एक पिशवी आणि दुकानदाराचा मोबाइल फोन पोलिसांनी जप्त केला होता.

खरेदी झाली, पैसे नव्हते, तिशीतील बहिणींच्या परवानगीने दुकानदाराचा अल्पवयीन मुलींवर बलात्कार
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Aug 31, 2021 | 11:39 AM

चेन्नई : कर्नाटकच्या म्हैसुरुमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्काराचा प्रकार ताजा असताना, तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तिशीच्या आत वय असलेल्या दोघी बहिणींनी एका दुकानदाराला आपल्याच अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण्याची परवानगी दिली आणि त्याचे व्हिडिओही रेकॉर्ड करु दिले. दुकानातून खरेदी केलेल्या सामानाच्या मोबदल्यात त्यांनी ही घृणास्पद डील केल्याचा आरोप आहे. दुकानदाराने बहिणींच्या अल्पवयीन मुलींच्या तीन मैत्रिणींवरही बलात्कार करुन त्याचे चित्रीकरण केल्याचा दावा केला जात आहे.

तंबाखूच्या साठ्यावरील छापेमारीवेळी प्रकार उघड

पेरुमल नावाच्या 48 वर्षीय दुकानदाराने प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ साठवल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या दुकानावर छापा टाकला असता ही बाब उघडकीस आली. छाप्यादरम्यान, तंबाखूच्या पदार्थांची एक पिशवी आणि दुकानदाराचा मोबाइल फोन पोलिसांनी जप्त केला होता.

काय आहे प्रकरण?

तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रेत्यांचा तपशील मिळवण्यासाठी जप्त केलेला दुकानदाराचा मोबाईल फोन तपासल्यावर पोलिसांना धक्काच बसला. मोबाईलच्या फोटो गॅलरीमध्ये त्यांना एका पुरुषाने लहान मुलांवर केलेल्या लैंगिक अत्याचाराचे सुमारे 50 व्हिडिओ आढळले. पोलिसांना सुरुवातीला वाटले की दुकानदाराने चाईल्ड पॉर्न डाऊनलोड केले आहे. मात्र व्हिडीओ क्लिपमध्ये दिसणारी व्यक्ती ही खुद्द दुकानदार पेरुमल असल्याचं सिद्ध झालं. त्यानंतर पेरुमलला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं. टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार चौकशी दरम्यान त्याने पोलिसांना सांगितले, की तो पाच अल्पवयीन मुलांवर गेल्या सहा महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करत होता.

पैशांच्या मोबदल्यात अल्पवयीन मुलींशी लैंगिक संबंध

पोलिसांना असेही समजले की अनुक्रमे 30 आणि 28 वर्षांच्या दोन बहिणी देखील या गुन्ह्यात सहभागी होत्या. या दोघींनाही अटक करण्यात आली आहे. त्यापैकी एकीचे दुकानदाराशी प्रेमसंबंध होते. बहिणींनी दुकानातून खरेदी केलेल्या सामानाचे पैसे देण्याऐवजी त्यांच्या अल्पवयीन मुलींशी लैंगिक संबंध ठेवण्यास आणि त्याचे व्हिडीओ शूट करण्याची दुकानदाराला परवानगी दिली. मुलींच्या तीन मैत्रिणी ज्या त्यांच्या घरी खेळायला येत असत, त्यांच्यावरही दुकानदाराने वारंवार बलात्कार केल्याचे समोर आले आहे.

“आपल्यासोबत घडलेला घृणास्पद प्रकार समजून पालकांना सांगण्याइतकी ही तीन मुले मोठी नव्हती. जर पोलीस निरीक्षकाने आरोपीचा मोबाईल फोन तपासला नसता, तर हे प्रकरण उघडकीस आलेही नसते आणि त्याने आणखी लहान मुलांचा गैरवापर केला असता ”असे उपायुक्त कार्तिकेयन यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या :

पुण्यात सराईत बाल गुन्हेगारांकडून अल्पवयीन मुलीवर वारंवार सामूहिक बलात्कार, कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी

बीडमध्ये 28 वर्षीय विवाहितेवर बलात्कार, सोशल मीडियावर फोटो अपलोड करण्याची धमकी

जीवे मारण्याची धमकी, जालन्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, एकाला अटक

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.