बीडमध्ये 28 वर्षीय विवाहितेवर बलात्कार, सोशल मीडियावर फोटो अपलोड करण्याची धमकी

बीडच्या चकलांबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या शिंगारवाडी येथील 28 वर्षीय विवाहित महिलेवर बलात्कार झाला. गावात राहणारा नात्यातील आरोपी विक्रम काळे याने महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे

बीडमध्ये 28 वर्षीय विवाहितेवर बलात्कार, सोशल मीडियावर फोटो अपलोड करण्याची धमकी
विवाहितेवर बलात्कार

बीड : बीड जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वारंवार समोर येत आहेत. 28 वर्षीय विवाहितेवर बलात्कार झाल्याची घटना ऐन रक्षाबंधनच्या दिवशी समोर आली आहे. सोशल मीडियावर फोटो अपलोड करण्याची धमकी देत नात्यातील व्यक्तीनेच महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

नेमकं काय घडलं?

बीडच्या चकलांबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या शिंगारवाडी येथील 28 वर्षीय विवाहित महिलेवर बलात्कार झाला. गावात राहणारा नात्यातील आरोपी विक्रम काळे याने महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. सोशल मीडियावर फोटो अपलोड करण्याची धमकी देत त्याने अत्याचार केले.

आरोपी पोलिसांच्या ताब्यात

महिला शेतामध्ये काम करत असताना, जवळ कोणी नसल्याची संधी साधून त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची फिर्याद पीडित महिलेने चकलांबा पोलिसांत दिली आहे. या प्रकरणी आरोपी विक्रम काळे याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला चकलांबा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

दुसरीकडे, बीडमध्ये नेकनूरजवळ असलेल्या छोट्याशा गावातील 11 वर्षीय पीडितेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. मुलीचे आई-वडील बाहेरगावी गेल्यानंतर ती आपल्या मक्याच्या शेताजवळ खेळत होती. यावेळी तिथून जाणाऱ्या 24 वर्षीय नराधमाने तिला उचलून मक्याच्या शेतात अत्याचार केला. हा प्रकार लक्षात येताच शेजारच्या शेतात असणार्‍या दोन व्यक्तींनी तात्काळ पळत जात त्या तरुणाला पकडलं आणि पीडितेच्या आई-वडिलांना कळवलं.

जालन्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

दरम्यान, जालना जिल्ह्यातील बदनापुर तालुक्यातील कंडारी खुर्द येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटनाही नुकतीच समोर आली होती. मुलगी एकटी असल्याचे लक्षात येताच आरोपी सोपान ढाकणे आणि शंभु ढाकणे या दोघांनी मुलीला निर्जन स्थळी नेले. तिथे तिला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर या घटनेबद्दल कुणाला सांगू नको, म्हणून पुन्हा धमकी दिल्याचा आरोप आहे.

संबंधित बातम्या :

उपराजधानी हादरली, नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

जीवे मारण्याची धमकी, जालन्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, एकाला अटक

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI