Nanded Crime | दोन तलवारी हातात घेत सोशल मीडियावर भाईगिरी, तरुणासह आई वडिलांनाही अटक

| Updated on: Apr 12, 2022 | 3:35 PM

दोन तलवारी हातात घेऊन सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या युवकाला पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. नांदेड शहरात राहणाऱ्या सहिल ठाकूरने दोन तलवारी हातात घेऊन रक्ताने माखलेल्या शर्टवरील फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता

Nanded Crime | दोन तलवारी हातात घेत सोशल मीडियावर भाईगिरी, तरुणासह आई वडिलांनाही अटक
राजगडावर पर्यटनासाठी गेलेल्या चौघा जणांवर मधमाशांचा हल्ला
Image Credit source: टीव्ही9
Follow us on

नांदेड : दोन तलवारी (Sword) हातात घेऊन सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट करणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी चांगलाच हिसका दाखवला. त्या युवकाच्या घरात तलवारी आणि खंजीर यासारखे घातक शस्त्र सापडले आहेत. त्यामुळे मुलाच्या आई वडिलांनाही अटक करुन पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. नांदेड शहरात (Nanded Crime) राहणाऱ्या सहिल ठाकूर या युवकाने दोन तलवारी हातात घेऊन रक्ताने माखलेल्या शर्टवरील फोटो पोस्ट करत भाईगिरी करण्याचा प्रयत्न केला होता. विशेष म्हणजे या तरुणावर जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्या प्रकरणी गुन्हाही दाखल आहे.

काय आहे प्रकरण?

दोन तलवारी हातात घेऊन सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या युवकाला पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. नांदेड शहरात राहणाऱ्या सहिल ठाकूरने दोन तलवारी हातात घेऊन रक्ताने माखलेल्या शर्टवरील फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता

विक्रीच्या उद्देशाने घरात घातक शस्त्र ठेवल्याचा आरोप

ही पोस्ट पोलिसांपर्यंत पोहोचली आणि पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली. त्याच्या घरात 3 तलवारी, 2 खंजीर आणि 2 कुकऱ्या मिळाल्या. विक्री करण्याच्या उद्देशाने घरात असे घातक शस्त्र ठेवल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करत पोलिसांनी साहिलसह त्याच्या आई वडिलांनाही अटक केली आहे.

विशेष म्हणजे साहिलवर जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्या प्रकरणी याआधी गुन्हाही दाखल आहे. त्यामुळे सोशल मीडियावर भाईगिरी करणाऱ्या पोस्ट कराल तर खबरदार असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

संबंधित बातम्या :

Pune Crime | ‘आमच्या गॅंगसोबत का राहत नाहीस?’ पुण्यात तरुणाला मारहाण करणारा गुंड जेरबंद

Pune Video | पुण्यात गुंडांचा उच्छाद, फुकट भाजी न दिल्याने तरुणाला पाया पडायला लावलं

कुख्यात गुंड गजानन मारणेच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा, अश्लील व्हिडिओ काढून धमकीही दिली?