AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मध्यरात्री भररस्त्यात हल्ला, 40 वर्षीय व्यक्तीच्या खुनाने परभणीत खळबळ

गट्टू आणि वीट डोक्यात घालून एका 40 वर्षीय व्यक्तीचा खून करण्यात आला. ही घटना परभणी जिल्ह्यात सेलू येथील विद्यानगर परिसरात घडली आहे. विशाल सदाफळे असे हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मध्यरात्री भररस्त्यात हल्ला, 40 वर्षीय व्यक्तीच्या खुनाने परभणीत खळबळ
परभणीत हत्याकांडImage Credit source: टीव्ही9
Reporter Prashant Chalindrawar
Reporter Prashant Chalindrawar | Edited By: Anish Bendre | Updated on: Mar 01, 2022 | 3:18 PM
Share

नजीर खान, टीव्ही9 मराठी, परभणी : 40 वर्षीय व्यक्तीचा खून (Murder) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गट्टू आणि वीट डोक्यात घालून त्याची हत्या करण्यात आली. परभणी जिल्ह्यात (Parabhani Crime) सेलू येथील विद्यानगर परिसरात हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. विशाल सदाफळे असं मयत व्यक्तीचं नाव आहे. मात्र सदाफळेची हत्या कोणी केली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तसेच त्याच्या हत्येमागील नेमक्या कारणाचाही अजूनपर्यंत उलगडा झाला नाही. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही हत्या झाल्याचा अंदाज आहे.

नेमकं काय घडलं?

गट्टू आणि वीट डोक्यात घालून एका 40 वर्षीय व्यक्तीचा खून करण्यात आला. ही घटना परभणी जिल्ह्यात सेलू येथील विद्यानगर परिसरात घडली आहे. विशाल सदाफळे असे हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

हत्येचं कारण अस्पष्ट

हा खून कोणी आणि कशासाठी केला, याचा मात्र उलगडा झालेला नाही. ही माहिती मिळताच सेलू पोलीस घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथक आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे.

ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली असल्याचा अंदाज आहे. पोलिसांच्या तपासात काय निष्पन्न होते, हेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे. घटनेनंतर शहरात मात्र एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या :

हत्येच्या दोन घटनांनी मुंबईत खळबळ, अँटॉप हिलमध्ये मृतदेह जाळला, लालबागमध्ये भावाचाच खून

बहिणीला त्रास देणाऱ्या भाऊजींची हत्या, लातूरमध्ये दोघा मेव्हण्यांना बेड्या

Triple Murder | आधी सीएनजी स्टेशनचे लाईट बंद केले, मग मॅनेजरसह तिघांचा खून

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...