बहिणीला त्रास देणाऱ्या भाऊजींची हत्या, लातूरमध्ये दोघा मेव्हण्यांना बेड्या

बहिणीला त्रास दिल्याचा राग आल्याने मेहुण्यांनीच भाऊजींची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लातूर शहरातील नवीन एमआयडीसी भागात ही घटना घडली आहे.

बहिणीला त्रास देणाऱ्या भाऊजींची हत्या, लातूरमध्ये दोघा मेव्हण्यांना बेड्या
लातूरमध्ये मेहुण्यांकडून भावोजींची हत्याImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 10:52 AM

लातूर : बहिणीला त्रास देणाऱ्या भाऊजींची मेहुण्यांनीच हत्या (Murder) केली. लातूर शहरातील (Latur Crime) नवीन एमआयडीसी भागात ही घटना घडली आहे. बहिणीला भाऊजी (Brother in law) त्रास देत असल्याच्या कारणावरून दोन मेव्हुणे पती-पत्नीच्या भांडणात पडले. त्यानंतर दोघांनी भाऊजींना लाकडाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत विजयकुमार पिल्ले (वय 37 वर्ष) यांचा मृत्यू झाला आहे. दोघा मेहुण्यांसह त्यांच्या आणखी दोन साथीदारांनीही मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटने प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी चारही आरोपींना ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

काय आहे प्रकरण?

बहिणीला त्रास दिल्याचा राग आल्याने मेहुण्यांनीच भाऊजींची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लातूर शहरातील नवीन एमआयडीसी भागात ही घटना घडली आहे.

नेमकं काय घडलं?

बहिणीला भाऊजी त्रास देत असल्याच्या कारणावरून दोन मेव्हुणे पती-पत्नीच्या भांडणात पडले. त्यानंतर दोघांनी भाऊजींना लाकडाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत विजयकुमार पिल्ले (वय 37 वर्ष) जखमी झाले होते. विजयकुमार यांना दवाखान्यात नेण्यात आले, मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

या घटने प्रकरणी एमआयडीसी पोलिसात आरोपी मेव्हुणे गणेश चटनाळे (वय 23 वर्ष), बसवराज चटनाळे (वय 32 वर्ष) यांचे साथीदार ओंकार धोत्रे (वय 20 वर्ष), शहानवाज पठाण (वय 21 वर्ष) या चौघांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी चारही आरोपींना ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

बहिणीच्या दुसऱ्या लग्नाला आक्षेप, भावाचा प्राणघातक हल्ला, ताईसह होणारा नवरा गंभीर जखमी

अनैतिक संबंधांचा संशय, बाईकवर बसवून मनमाड रोडवर नेलं, तरुणाकडून मेव्हण्याची हत्या

वहिनी आंघोळ करतानाचा व्हिडीओ शूट, ब्लॅकमेल करत पुण्यात दिराकडून बलात्कार

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.