
सातारा : मटका व्यावसायिकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डोक्यात गोळ्या (Firing) झाडून त्याचा खून करण्यात आल्याचं समोर आहे. इमारतीच्या छतावर व्यावसायिक मृतावस्थेत आढळला. सातारा जिल्ह्यात (Satara Crime) खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील फुल मळा परिसरात हा प्रकार घडला. लेक पॅलेस अपार्टमेंटच्या छतावर व्यावसायिकाचा मृतदेह सापडला होता. रविवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मटका व्यावसायिकाची हत्या (Murder) झाल्याचा आरोप आहे. मयत व्यक्ती हा पुण्यातील मटका व्यावसायिक असल्याची माहिती आहे. त्याची हत्या नेमकी कोणी आणि कुठल्या कारणासाठी केली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
मटका व्यावसायिकाची डोक्यात गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संजय सुभाष पाटोळे (रा. बिबवेवाडी, पुणे) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. इमारतीच्या छतावर व्यावसायिक मृतावस्थेत आढळला.
सातारा जिल्ह्यात खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील फुल मळा परिसरात लेक पॅलेस अपार्टमेंटच्या छतावर व्यावसायिकाचा मृतदेह सापडला होता. रविवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.
पोलिसांना याची माहिती मिळताच तात्काळ शिरवळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांना मृतदेहाच्या जवळ आधार कार्ड सापडले. त्यावरून मृत व्यक्ती संजय पाटोळे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
संबंधित व्यक्तीची अधिक माहिती घेतली असता तो पुण्यातील मटका व्यावसायिक असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार पोलिसांनी आज्ञात मारेकर्याचा शोध सुरु केला आहे.
संबंधित बातम्या :
कॉन्स्टेबल नवऱ्याची कॉन्स्टेबल बायको, नायब तहसीलदारावर जीव जडला, नाल्यात मृतदेह आढळला
अखेरपर्यंत मैत्री निभावली, सुप्रिया शिंदे खून प्रकरण, मैत्रिणींमुळे आरोपीचा सुगावा