सावंतवाडीत भरवस्तीत दुहेरी हत्याकांड, दोन वयोवृद्ध महिलांचा राहत्या घरी खून

| Updated on: Oct 31, 2021 | 11:46 AM

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहरात अंगावर शहारे आणणारी घटना उघडकीस आली आहे. दोन वयोवृद्ध महिलांचा निर्घृण खून करण्यात आला. खुनाचे कारण गुलदस्त्यात आहे

सावंतवाडीत भरवस्तीत दुहेरी हत्याकांड, दोन वयोवृद्ध महिलांचा राहत्या घरी खून
मालमत्तेच्या वादातून बंगालमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
Follow us on

सिंधुदुर्ग : दोन वयोवृद्ध महिलांच्या हत्याकांडाने सिंधुदुर्गात एकच खळबळ उडाली आहे. सावंतवाडी शहरातील भरवस्तीत राहणारी वृद्ध महिला आणि तिचा सांभाळ करणाऱ्या दुसऱ्या महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली. महिलेच्या अंगावरील दागिने लंपास झाले आहेत, मात्र खुनाचं नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.

काय आहे प्रकरण?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहरात अंगावर शहारे आणणारी घटना उघडकीस आली आहे. दोन वयोवृद्ध महिलांचा निर्घृण खून करण्यात आला. खुनाचे कारण गुलदस्त्यात आहे, मात्र महिलेच्या अंगावरील दागिने गायब असल्यामुळे चोरीच्या उद्देशाने दुहेरी हत्या झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं?

खून झालेल्या महिलेचे नाव नीलिमा नारायण खानोलकर होते. तर त्याच्यासोबत असणाऱ्या केअरटेकर श्यामली शांताराम सावंत यांची सुद्धा हत्या करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांच्या नजरेत ही घटना आली. खून झाल्याचे समजताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

दरम्यान, सावंतवाडी शहरातील उभा बाजार भागात ही घटना असून सावंतवाडी शहरातील भरवस्तीत खून झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. सावंतवाडी पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

दिवाळीची रोषणाई करताना विजेचा धक्का, पतीचा मृत्यू, वाचवायला गेलेली पत्नी-मुलंही जखमी

मटण शॉपमधून 9 बकरे चोरीला, दुसऱ्यावर आळ घेण्याचा डाव सीसीटीव्हीमुळे फसला

रत्नागिरीतील नौका समुद्रात बेपत्ता, सहा खलाशांसोबत पाच दिवसांपासून संपर्क नाही