Maharashtra Police: महाराष्ट्रातील 11 अधिकाऱ्यांचा उत्कृष्ट तपासासाठी विशेष सन्मान, वाचा कुणाकुणाला मिळाले केंद्रीय गृहमंत्रीपदक?

| Updated on: Aug 13, 2022 | 8:13 AM

उत्कृष्ट तपास करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना दरवर्षी केंद्रीय गृहमंत्री पदकाने सन्मानित करण्यात येते. त्यानुसार यंदाही स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 11 अधिकाऱ्यांची या पदकासाठी निवड झाली आहे.

Maharashtra Police: महाराष्ट्रातील 11 अधिकाऱ्यांचा उत्कृष्ट तपासासाठी विशेष सन्मान, वाचा कुणाकुणाला मिळाले केंद्रीय गृहमंत्रीपदक?
Follow us on

मुंबई : ‘खाकी’तील योध्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी पदकं घोषित करण्यात आली आहेत. विविध घडामोडी घडत असतात. काही घटनांमध्ये पोलीसांनाही (Maharashtra Police) जोखीम पत्करून तपास करावा लागतो. अनेकदा जीविताचा प्रश्न निर्माण होतो. पण अश्या परिस्थितीतही आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून काहीजण काम करत राहतात. त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी केंद्रीय गृह विभागाकडून विशेष पुरस्कार देण्यात येतात. यंदाच्या या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. उत्कृष्ट तपासासाठी देण्यात येणारे यंदाचे केंद्रीय गृहमंत्री पदकं (Central Home Minister’s Medal) जाहीर करण्यात आले आहेत. देशातील 151 अधिकारी या पदकाचे मानकरी ठरले असून त्यात महाराष्ट्रातील 11 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यात कृष्णकांत उपाध्याय, समीर अहिरराव, राणी काळे यांचा समावेश आहे.

गृहमंत्रीपदकांची घोषणा

‘खाकी’तील योध्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी पदकं घोषित करण्यात आली आहेत. विविध घडामोडी घडत असतात. काही घटनांमध्ये पोलीसांनाही जोखीम पत्करून तपास करावा लागतो. अनेकदा जीविताचा प्रश्न निर्माण होतो. पण अश्या परिस्थितीतही आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून काहीजण काम करत राहतात. त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी केंद्रीय गृह विभागाकडून विशेष पुरस्कार देण्यात येतात. यंदाच्या या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. उत्कृष्ट तपासासाठी देण्यात येणारे यंदाचे केंद्रीय गृहमंत्री पदकं जाहीर करण्यात आले आहेत.

उत्कृष्ट तपास करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना दरवर्षी केंद्रीय गृहमंत्री पदकाने सन्मानित करण्यात येते. त्यानुसार यंदाही स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील 11 अधिकाऱ्यांची या पदकासाठी निवड झाली झाली असून त्यात मुंबईतील पोलीस उपआयुक्त कृष्णकांत उपाध्याय तसेच पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर, अजित पाटील, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक निरीक्षक राणी काळे, मनोज पवार, पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल, दिलीप पवार, दीपशिका वारे, सुरेशकुमार राऊत, जितेंद्र वनकोटी, समीर अहिरराव या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यावेळी केंद्रशासित प्रदेशातील उत्कृष्ट तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनादेखील केंद्रीय गृहमंत्री पदके जाहीर झाली आहेत.

हे सुद्धा वाचा

देशभरातील 151 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मध्य प्रदेशातील 11, उत्तर प्रदेशातील 10, तामिळनाडूचे 8, बिहारचे 7, गुजरात, कर्नाटक आणि दिल्लीचे प्रत्येकी 6 आणि राजस्थान व केरळच्या प्रत्येकी 9 पोलीस अधिकाऱ्यांना गृहमंत्री पदक देऊन सन्मान करण्यात आला आहे. तपासात उच्च मापदंड, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा, असाधारण साहसाचा परिचय देणाऱ्यांना या सन्मानाने गौरविण्यात आलं आहे.