महाराष्ट्र हादरला! आई-वडील मजूरीसाठी जाताच 10 वर्षांच्या मुलीने स्वत:ला संपवले, काळीज पिळवटून टाकणारी घटना

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात हृदयद्रावक घटना घडली. एका 10 वर्षांच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादला आहे. आता तिने नेमकं हे पाऊल का उचलले याचा तपास पोलीस घेत आहेत.

महाराष्ट्र हादरला! आई-वडील मजूरीसाठी जाताच 10 वर्षांच्या मुलीने स्वत:ला संपवले, काळीज पिळवटून टाकणारी घटना
Nashik Crime
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Dec 08, 2025 | 3:28 PM

गेल्या काही दिवसांपासून राज्यात आत्महत्येची प्रकरणे सतत कानावर येत आहेत. आता महाराष्ट्रातील नाशिक येथील सामनगाव येथे राहणाऱ्या 10 वर्षांच्या मुलीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण राज्य हादरुन गेले आहे. मुलीने फाशी घेत स्वत:ला संपवले. आता नेमकं काय झालं? याचा तपास पोलीस करत आहेत. घटना घडली तेव्हा मुलीचे आई-वडील मजुरी करण्यासाठी गेले होते.

सामनगाव येथील १० वर्षीय चिमुकलीची हृदय पिळवटून टाकणारी घटना

नाशिक तालुक्यातील सामनगाव येथे राहणारी १० वर्षांची मुलगी घरी एकटीच होती. तिचे आई-बाबा रोजंदारी मजुरीसाठी गेले होते. त्याचवेळी तिने घरातल्या नायलॉनच्या दोरीने छताला गळफास लावून घेतला. परत आलेल्या नातेवाईकांनी तिला बेशुद्धावस्थेत पाहिले आणि तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, नंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर या प्रकरणाची माहिती पोलीसांना देण्यात आली.

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

पोलिसांनी सांगितले की, मुलीने आत्महत्या का केली याचे अद्याप कोणतेही स्पष्ट कारण समोर आलेले नाही. सुसाईड नोट सापडलेली नाही आणि कुटुंबीयांनीही कोणत्या मानसिक तणावाची किंवा वादाची माहिती दिलेली नाही. नाशिकरोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने संपूर्ण सामनगाव हादरले असून, एवढ्या चिमुकलीने असा निर्णय का घेतला? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

पेठरोड येथे ४३ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या

नाशिक शहरातील पेठरोड परिसरात 43 वर्षीय उत्तम लाजरस तोरण यांनी घरात घरात बेडशीटचा वापर करून पंख्याला गळफास घेतला. घटनेच्या वेळी घरातील इतर सदस्य देखील उपस्थित होते. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. परंतु जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केले. उत्तम हे श्रीराम रो हाउस, पेठरोड येथे पत्नी ललिता तोरण यांच्यासोबत राहत होते. पत्नीने पोलिसांना माहिती दिली. म्हसरूळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून हवालदार सोनवणे तपास करत आहेत.

दोन्ही प्रकरणांचा पोलीस गंभीरतेने तपास करत आहेत. मानसिक तणाव, कौटुंबिक कलह किंवा सामाजिक दबाव अशा कारणांमुळे असे टोकाचे पाऊल उचलले जाते, असे पोलीस अधिकारी सांगतात.